भारतीय बॅँकांचे हजारो कोटी रुपये पळवून गेलेल्या विजय मल्या, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्याभोवतीचा फास मोदी सरकारने आवळला आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच परदेशात पळून गेलेल्या कर्जबुडव्यांच्या संपत्तीवर टाच आणून बॅँकांची रक्कम वसूल करून देण्यात आली आहे. विजय मल्या, मेहूल चोक्सी आणि निरव मोदी यांच्याकडून १८ हजार १७० कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.Modi govt done it, collects more than 80 per cent of money from debtors, confiscates assets worth Rs 18,170 crore
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय बॅँकांचे हजारो कोटी रुपये पळवून गेलेल्या विजय मल्या, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्याभोवतीचा फास मोदी सरकारने आवळला आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच परदेशात पळून गेलेल्या कर्जबुडव्यांच्या संपत्तीवर टाच आणून बॅँकांची रक्कम वसूल करून देण्यात आली आहे.
विजय मल्या, मेहूल चोक्सी आणि निरव मोदी यांच्याकडून १८ हजार १७० कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.सक्तवसुली संचालनालयानं केलेल्या ट्विटनुसार ईडीनं आतापर्यंत विजय मल्ल्या , मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांची एकूण १८ हजार १७० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.
बँकांच्या झालेल्या एकूण नुकसानापैकी ही रक्कम जवळपास ८०.४५ टक्के इतकी आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीपैकी मोठा हिस्सा सरकारी बँका आणि केंद्र सरकारच्या ताब्यात देण्यात आल्याचंही ईडीनं म्हटलं आहे. यात एकूण ९ हजार ३७१ कोटी रुपयांचा समावेशआहे.
मेहुल चोक्सी यानं एकट्यानंच पंजाब नॅशनल बँकेला १३,५०० कोटी रुपयांचा चूना लावला आहे. सध्याच्या घडीला विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी हे देशाचे मोस्ट वॉण्टेड आर्थिक थकबाकीदार आहेत. तिघांनाही भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच तिघांनाही भारतात आणलं जाईल अशी आशा आहे. तिघांनीही देशातील बँकांना हजारो कोटी रुपयांचा चूना लावला आहे.
ईडीनं दिलेल्या माहितीनुसार विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चौक्सी यांनी सरकारी बँकांना एकूण २२ हजार ५८५ कोटी रुपयांचा चूना लावला आहे. तिघांची एकूण मिळून १८ हजार १७० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीपैकी ९६९ कोटींची मालमत्ता विदेशात आहे. सरकारी बँकांना आतापर्यंत ८,४४१ कोटी रुपये परत करण्यात आले आहेत.
कर्ज बुडव्या विजय मल्याकडून सुमारे 6,200 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहें. हे कर्ज विजय मल्ल्याने त्यांच्या विमान कंपनी किंगफिशरसाठी घेतले होते. युनायटेड ब्रेवरीज लिमिटेड, युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड आणि मॅकडोनाल्ड होल्डिंग्स लिमिटेडच्या शेअर्स विक्रीतून रक्कम वसूल करण्यात आली.
आर्थिक संकटामुळे मल्ल्याची विमान कंपनी किंगफिशर 20 आॅक्टोबर 2012 पासून उड्डाण करू शकली नाही. कर्ज न भरल्यामुळे आणि बँकांना फसवल्याप्रकरणी विजय मल्ल्याला जानेवारी 2019 मध्ये एक फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले आहे. मल्ल्या 2 मार्च 2016 रोजी भारत सोडून गेला होता. विजय मल्ल्या यांनी 17 बँकांकडून सुमारे 9 हजार कोटी रुपये आणि त्यांचे व्याज अद्याप दिलेले नाही.