वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारत चीन सीमेसंदर्भात काँग्रेस नेते बेछूट आरोप करतात. चिनी सीमेवर सध्या भारताची सर्वाधिक सैन्य तैनाती आहे. ते सैन्य काय राहुल गांधींनी पाठवले का??, ते तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिथे पाठवले आहे, असा टोला परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत लगावला आहे. Modi government and not rahul Gandhi deployed major chunk of army on China border, s. Jaishankar hits back
राहुल गांधींनी लोकसभेत केलेले भाषण त्यामध्ये चीनचा केलेला उल्लेख या विषयावर तसेच काँग्रेसने केलेल्या प्रत्येक आरोपावर जयशंकर यांनी मुलाखतीत सडेतोड उत्तर दिले. जयशंकर म्हणाले, की चीनने भारताची जी जमीन बळकवली आहे, ती 1962 च्या युद्धात बळकावली आहे. आज काँग्रेसचे नेते मोदी सरकारवर आरोप करतात. पण 1962 च्या युद्धाच्या वेळी त्याच पक्षाच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार होते. भारताच्या बळकावलेल्या जमिनीवर चीन फुल तयार करत आहे. वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चर उभारत आहे, हा दोष केंद्रातल्या मोदी सरकारचा नाही.
उलट मोदी सरकारने सीमेवरील भारताचे इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणावर वाढवले. रस्ते बांधणीपासून सीमेवरील तैनातीपर्यंत भारताने मोदी सरकारच्या काळात आघाडी घेतली आहे. काँग्रेस पक्षाच्या सरकारने सीमेकडे कायम दुर्लक्ष केले. त्यामुळे “सॉफ्ट बॉर्डर” ही कन्सेप्ट तयार झाली. मग काँग्रेस सरकारांना सुरक्षेची काळजी नव्हती असे म्हणायचे का??, असा परखड सवाल जयशंकर यांनी या मुलाखतीत केला.
पाकिस्तान स्वतःच्या देशातल्या नागरिकांना पोसू शकत नाही. दोन वेळचे जेवण देऊ शकत नाही. पण काश्मीरवर कब्जा करून तिथे दहशतवाद मनुफॅक्चरिंगचे काम जोरात सुरू आहे, असा आरोपही जयशंकर यांनी केला.
राहुल गांधींनी लोकसभेत केलेल्या भाषणात मोदी सरकारवर विविध आरोप केले होते. चीनने भारताची जमीन बळकावली त्यावेळी मोदी सरकारने चीनला प्रत्युत्तर दिले नाही, या आरोपाचा त्यात समावेश होता. या मुद्द्यावरून जयशंकर यांनी राहुल गांधींना स्पष्ट शब्दात सुनावले. ते म्हणाले, की चिनी सीमेवर सध्या भारताची सर्वाधिक तैनाती आहे. हे सैन्य राहुल गांधींनी तिथे पाठवले आहे का??, ते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवले आहे. मोदींनी संरक्षण आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 5 पटीने वाढ केली आहे. 2014 पर्यंत सीमेवर इन्फ्रास्ट्रक्चर उभारताना फक्त 4 – 5 हजार कोटी रुपये मिळायचे. आता सीमेवरील इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तब्बल 14 हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले आहे.
Modi government and not rahul Gandhi deployed major chunk of army on China border, s. Jaishankar hits back
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींच्या दिवंगत वडिलांची खिल्ली उडवल्याबद्दल काँग्रेस नेते पवन खेरा यांच्याविरुद्ध वाराणसी आणि लखनऊमध्ये एफआयआर
- तुर्कस्तान-सीरियात पुन्हा भूकंप : 6.4 तीव्रता, इस्रायलपर्यंत जाणवले धक्के, 3 ठार, 213 जखमी
- मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान गायक सोनू निगमला धक्काबुक्की, ठाकरे गटाच्या आमदार पुत्रावर गुन्हा दाखल