प्रतिनिधी
नवी दिल्ली : आधार कार्ड हे भारतात अतिशय आवश्यक कागदपत्र आहे. सध्याच्या काळात हरएक सरकारी योजनेचा लाभ घेण्यापासून ते शाळेत प्रवेश घेण्यापर्यंत आधार क्रमांक मागितला जातो. याशिवाय बँकेत खाते उघडण्यापासून ते सिमकार्ड मिळवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत आधार आवश्यक झालेले आहे. पण आधार चुकीच्या हातात पडल्यास त्याचा गैरवापर होण्याचीही शक्यता असते.Misuse of Aadhaar Card You can check from home, register complaint here
आधार क्रमांकाचा गैरवापर कसा ओळखाल?
तुमच्या आधार क्रमांकाचा गैरवापर होत असल्याची भीतीही तुम्हाला वाटत असेल. त्यामुळे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या अधिकृत साइटवर तुमचा आधार क्रमांक कधी आणि कुठे वापरला गेला हे तुम्ही ऑनलाइन तपासू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
अशी आहे पद्धत
सर्वात आधी आधारची अधिकृत वेबसाइट uidai.gov.in/ या लिंकवर जावे लागेल. येथे आधार सेवांच्या तळाशी आधार प्रमाणीकरण इतिहासाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
येथे तुम्हाला आधार क्रमांक आणि दिसणारा सुरक्षा कोड टाकावा लागेल आणि सेंड ओटीपी वर क्लिक करावे लागेल. यानंतर आधारशी लिंक केलेल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर पडताळणीसाठी एक ओटीपी येईल, हा ओटीपी टाका सबमिट वर क्लिक करा. यानंतर, ऑथेंटिकेशन प्रकार आणि तारीख श्रेणी आणि ओटीपी यासह विचारलेली माहिती भरावी. (तुम्ही ६ महिन्यांपर्यंतचा डेटा पाहू शकता.ओटीपी वर क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक लिस्ट येईल. ज्यामध्ये आधारचा वापर गेल्या ६ महिन्यांत केव्हा आणि कुठे झाला याची माहिती दिली जाईल.
अशी करा तक्रार
रेकॉर्ड पाहून, आधार कार्डचा गैरवापर झाला आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही लगेच तक्रार नोंदवू शकता. तुम्ही टोल फ्री नंबर 1947 वर कॉल करून किंवा help@uidai.gov.in वर ईमेल करून तक्रार नोंदवू शकता किंवा https:/resident.uidai.gov.in/file-complaint लिंकवर ऑनलाइन तक्रार देखील करू शकता.
Misuse of Aadhaar Card You can check from home, register complaint here
महत्वाच्या बातम्या
- 9 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 13 ऑगस्टला प्रसिद्ध होणार
- १०० कोटींमध्ये राज्यसभेची जागा, राज्यपाल करण्याचे आमिष, CBIने केला टोळीचा पर्दाफाश
- द फोकस एक्सप्लेनर : डॉलरच्या तुलनेत का कमजोर झाला रुपया? कशी सांभाळणार स्थिती? वाचा सविस्तर…
- Droupadi Murmu Profile : कोण आहेत द्रौपदी मुर्मू? पतीच्या निधनानंतर 2 मुलेही गमावली, शिक्षिका झाल्या; नंतर पाटबंधारे विभागात लिपिक म्हणून काम