उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचे भाजपाचे लक्ष्य आहे
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या भारतीय जनता पार्टीने उत्तर प्रदेशमध्ये आपली नवी टीम जाहीर केली आहे. पक्षाच्या वतीने संघटनेचे १८ प्रदेश उपाध्यक्ष, ७ सरचिटणीस आणि सर्व सहा क्षेत्रांच्या अध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपाने जाहीर केलेल्या यादीत योगी सरकारमध्ये मंत्री झालेले जेपीएस राठोड, एके शर्मा आणि दैशंकर सिंह यांच्या जागी अन्य चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. Mission Lok Sabha 2024 Uttar Pradesh BJPs new team announced
पक्षाने नोएडातील आमदार पंकज सिंह, विजय बहादूर पाठक, कांता कर्दम, संतोष सिंह आणि १८ नेत्यांना प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. दुसरीकडे गोविंद नारायण शुक्ला, अनूप गुप्ता, अमरपाल मौर्य, प्रियांका सिंह रावत यांची पुन्हा एकदा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश भाजपाचे संघटन सरचिटणीस धरमपाल सिंह आणि प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी नुकतीच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. तिन्ही नेत्यांनी भाजपाच्या नव्या टीमच्या नावावर चर्चा केली होती.
विशेष म्हणजे उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचे भाजपाचे लक्ष्य आहे. यासाठी पक्ष मिशन ८० वर काम करत आहे. त्यादृष्टीने सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. २०२४ च्या निवडणुका प्रदेशाध्यक्ष भूपेंद्रसिंह चौधरी यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत. अशा स्थितीत राज्य संघटनेबाबतही विचारमंथन सुरू होते. ज्याची आता घोषणा करण्यात आली आहे.
Mission Lok Sabha 2024 Uttar Pradesh BJPs new team announced
महत्वाच्या बातम्या
- ‘’भ्रष्टाचारावर बोलण्यापूर्वी राहुल गांधींना लाज वाटली पाहिजे, ते स्वत: … ‘’ रविशंकर प्रसाद यांचा घणाघात!
- पुण्यातील ऐतिहासिक पुण्यश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या जागेवर दर्ग्याचं अतिक्रमण – मनसेचा दावा!
- उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला एक वर्ष पूर्ण; पंतप्रधान मोदींचे मानले आभार
- बोफोर्सच्या बदल्यातून मोदी – अदानींवर आरोप; काँग्रेसला राहुल गांधींमध्ये सापडले विश्वनाथ प्रताप सिंहांचे रूप!!