• Download App
    MISS UNIVERSE:मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधूच्या यशात महाराष्ट्राचा वाटा ! ट्रान्सजेंडर साईशा शिंदेची कमाल...|MISS UNIVERSE: Maharashtra contributes to the success of Miss Universe Harnaj Kaur Sandhu! Transgender Saisha Shinde's Max

    MISS UNIVERSE:मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधूच्या यशात महाराष्ट्राचा वाटा ! ट्रान्सजेंडर साईशा शिंदेची कमाल…

    • सायशा शिंदे (पूर्वीचे स्वप्नील शिंदे) या वर्षी जानेवारीत ट्रान्सवुमन म्हणून समोर आली .
    • हरनाज संधूने मिस युनिव्हर्सचा ताज डोक्यावर घालण्यासाठी घातलेला गाऊन डिझायनर सायशा शिंदेने डिझाइन केला होता. साईशा ही ट्रान्सवुमन आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई:भारताच्या हरनाज सिंधूने 13 डिसेंबर रोजी तिच्या डोक्यावर मिस युनिव्हर्स 2021 चा मुकुट घातला. त्याच्या या विजयासह भारताला तब्बल 21 वर्षांनी हा ताज परत मिळाला. 2000 मध्ये लारा दत्ताच्या विजयानंतर 21 वर्षांनी 13 डिसेंबर रोजी भारताच्या हरनाज संधूला मिस युनिव्हर्सचा ताज मिळाला.भारतीय सौंदर्याने पुन्हा एकदा जगाला भुरळ घातली.MISS UNIVERSE: Maharashtra contributes to the success of Miss Universe Harnaj Kaur Sandhu! Transgender Saisha Shinde’s Max

    जागतिक पटलावर महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताच्या हरनाज कौर संधूने बाजी मारली. या विजयामागे एका मराठी व्यक्तीचा हात आहे. कोण आहे ती मराठी व्यक्ती जाणून घेऊया…



    हरनाजने यावेळी सी-थ्रू एम्बेलिश्ड गाऊन ग्रँड फिनालेसाठी परिधान केला होता. हा गाऊन भारतातील एक प्रसिद्ध ट्रांसजेंडर फँशन डिझानयनरने डिझाईन केला होता. हरनाजच्या या ड्रेसची सोशल मिडीयावर बरीच चर्चा रंगली आहे.

    आपण जाणून घेऊया कोण आहे ती मराठमोळी फँशन डिझायनर

    हरनाजचा गाऊन डिझायन करणारी फॅशन डिझायनर आहे साईशा शिंदे. नुकतंचजानेवारी २०२१ मध्ये स्वप्निल शिंदेची सायशा शिंदे झाली होती. स्वप्निल शिंदेनी जानेवारी मध्ये आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आता मी एक ट्रांसवूमन असून माझी ओळख आजपासून सायशा शिंदे अशी असेल असं जाहीर केलं होतं.

    बॉलिवूडमधील अभिनेत्री करिना कपूर ,श्रध्दा कपूर आणि अनुष्का शर्मा या आघाडीच्या अभिनेत्रींचं सायशा ड्रेस डिझाईन करते. अनेक सिनेमांमध्येही फॅशन डिझायनर म्हणून सायशाने काम केलं आहे.

    हरनाजने मिस युर्निव्हर्सचा किताब पटकावल्यावर साईशानेआपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट लिहीत आपला आनंद व्यक्त केला आहे. इंस्टाग्राम पोस्टवर लिहिले “आम्ही ते केले”

    हरनाझ संधूचा आकर्षक सिल्व्हर गाऊन मणींनी सुशोभित केलेला प्लंगिंग नेकलाइन ऐतिहासिक क्षणाचा एक भाग बनला. त्याच्या डिझायनरसाठी, यापेक्षा आनंदी काय असू शकते. “आम्ही ते केले,” सायेशा शिंदेने सोमवारी तिच्या मोठ्या विजयाच्या बातमीनंतर एका Instagram पोस्टमध्ये लिहिले आणि मिस युनिव्हर्स हरनाझ संधूचा फोटो शेअर केला.

    तीने हा गाऊन तयार होत असतानाचा फोटो शेअर करत म्हटलं आहे की खूप जास्त टेन्शन होतं मला, रात्रीची झोप उडाली होती माझी, मी एका सुंदर मुलीला आपल्या विचारात सामावून घेत होते. हा ड्रेस डिझाईन करताना एका महिलेची कसोटी होती. आणि हो मला खात्री आहे की हा ड्रेस मिस युनिव्हर्स 2021 साठीच होता.

    MISS UNIVERSE: Maharashtra contributes to the success of Miss Universe Harnaj Kaur Sandhu! Transgender Saisha Shinde’s Max

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते