१८४८ मध्ये सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी भिडेवाड्यात शाळा सुरु केली. ती भारतातील मुलीसाठीची पहिली शाळा होती. Minister Smriti Irani greets Savitribai Phule
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती.१८४८ मध्ये सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी भिडेवाड्यात शाळा सुरु केली. ती भारतातील मुलीसाठीची पहिली शाळा होती.महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.
दरम्यान आज जयंतीनिमित्त सर्व स्तराहून सावित्रीबाईंना अभिवादन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी यांनी ट्विट करत सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.
स्मृति ईरानी म्हणाल्या की , ‘महिलांचे शिक्षण आणि स्री-पुरुष समानता, यासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या, स्री मुक्ती आंदोलनाच्या प्रणेत्या, देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनंम्र अभिवादन.महिला सशक्तिकरणासाठी त्यांनी केलेले प्रयत्न सर्व समाजासाठी प्रेरणादायी आहेत.’