• Download App
    प्रवासी भारतीय आणि पाकिस्तानी निदर्शकांना कुवेत देशाबाहेर काढणार!! Migrant Indian and Pakistani protesters to be expelled from Kuwait

    नुपुर शर्मा : प्रवासी भारतीय आणि पाकिस्तानी निदर्शकांना कुवेत देशाबाहेर काढणार!!

    वृत्तसंस्था

    कुवेत : प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात कथित वादग्रस्त उद्गार काढणाऱ्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्या विरोधात कुवेतमध्ये निदर्शने करणाऱ्या प्रवासी भारतीय, पाकिस्तानी आणि अन्य परकीय निदर्शकांवर कुवेत सरकार कठोर कारवाई करत आहे. Migrant Indian and Pakistani protesters to be expelled from Kuwait

    या निदर्शकांना कुवैती कायद्यानुसार अटक करून कुवेत बाहेर काढण्याची योजना सरकारने तयार केली आहे. या निदर्शकांना पुन्हा कुवेत मध्ये कधीच प्रवेश मिळणार नाही. नुपूर शर्मा यांच्या विरोधात निदर्शने आयोजित करून आणि निदर्शनांमध्ये सामील होऊन कुवेत मधल्या कायद्याचा प्रवासी भारतीय आणि पाकिस्तानी निदर्शकांनी भंग केला आहे. या कायदेभंगा बद्दल त्यांना अटक करून नंतर त्यांच्या देशांमध्ये परत पाठविण्यात येईल, असे कुवेत सरकारने जाहीर केले आहे.

    परकीयांना कुवेत मध्ये हे अधिकार नाहीत

    कुवेत मध्ये कोणत्याही परदेशस्थ प्रवासी नागरिकांना धरणे आंदोलन किंवा निदर्शने करण्याचा अधिकार नाही तसे केल्यास तू कु बैठी कायद्याचा भंग ठरतो नुपूर शर्मा यांच्या विरोधात निदर्शने करून प्रवासी भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांनी कायद्याचा भंग केल्यामुळे त्यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई होत आहे त्यांना पुन्हा कुवेतमध्ये आत मध्ये प्रवेश मिळणार नाही.

    निदर्शक प्रवासी भारतीय, पाकिस्तान्यांचे नुकसान

    • नुपुर शर्मा यांच्या वक्तव्यानंतर भारताचा निषेध करणाऱ्या देशांमध्ये कुवेतचा समावेश आहे. परंतु कोणत्याही परकीय नागरिकाला कुवेतमध्ये धरणे आंदोलन अथवा निदर्शने करण्याची कायद्यानुसार परवानगी नाही.
    • कुवेतची 75 % लोकसंख्या ही परकीय नागरिकांचीच आहे. त्यात 450000 भारतीयांचा समावेश आहे. नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने हे भारतीय कुवेतमध्ये राहतात. त्यांच्याकडून सुमारे 5.5 % परकीय चलन मिळते.
    • नुपुर शर्मा हिच्या विरोधात शेकडो प्रवासी भारतीय आणि पाकिस्तान यांनी सामील झाले होते. आता त्यांना नोकरी – व्यवसाय गमावून कुवेत सोडावा लागणार आहे.

    Migrant Indian and Pakistani protesters to be expelled from Kuwait

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य