विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : मायक्रोसॉफ्टकडून देशातील सर्वात मोठे डेटा सेंटर हैदराबादमध्ये उभारण्यात येणार आहे. यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील या आंतरराष्ट्रीय कंपनीकडून पुढील १५ वर्षांत १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.Microsoft to set up country’s largest data center in Hyderabad
तेलंगणामध्ये करण्यात येणारी ही दुसरी सर्वात मोठी विदेशी थेट गुंतवणूक ठरेल. यापूर्वी अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसने २.७७ अब्ज डॉलर्स गुंतवत मुंबईनंतर राज्यात दुसºया क्रमांकाची गुंतवणूक केल्याचे राज्याचे आयटी आणि औद्योगिक मंत्री के. टी. रामा राव यांनी सांगितले.
सध्या देशात मुंबई, पुणे व चेन्नई या ठिकाणी कंपनीचे डेटा सेंटर कार्यरत आहेत. हैदराबादमधील नवीन डेटा सेंटरमुळे कंपनीच्या देशातील ग्राहकांना क्लाऊड सेवा देण्याची क्षमता विस्तारण्यास मदत होईल. डेटा सोल्यूशन्स, कृत्रिम बुध्दीमत्ता (एआय), प्रॉडक्टिव्हिटी टूल्स यासह उद्योग, कंपन्या, शैक्षणिक संस्था, स्टार्टअप्स, शासकीय विभाग यांना अत्याधुनिक डेटा सुरक्षा मिळण्यास मदत होईल,
असे मायक्रोसॉफ्ट इंडियाचे अध्यक्ष अनंत माहेश्वरी यांनी सांगितले. मायक्रोसॉफ्टच्या डेटा सेंटरच्या माध्यमातून २०१६ ते २०२० दरम्यान अर्थव्यवस्थेत ९.५ अब्ज डॉलर्सचा महसूल जमा झाला असून १५ लाख रोजगारनिर्मिती झाल्याचे सांगण्यात येते.
Microsoft to set up country’s largest data center in Hyderabad
महत्त्वाच्या बातम्या
- Exit Poll : उत्तर प्रदेशासह 5 राज्यात चर्चा महिलांच्या status voting ची आणि तरुणांच्या class voting ची…!!
- नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांना अटक
- Uttar Pradesh Exit Poll 2022 : उत्तर प्रदेशमध्ये जय भाजपा तय भाजपा ! डबल इंजिन सरकार … मोदी-योगी सरकार..
- विधानसभा अध्यक्ष निवडणूक : 9 तारखेची परवानगी मागण्यासाठी अजित पवार, अशोक चव्हाण राज्यपालांच्या भेटीला… पण निवडणूक होणार??