• Download App
    लक्षद्विपचे प्रशासक बनणार असल्याच्या वृत्ताचा मेट्रोमॅन ई श्रीधरन यांनी केला इन्कार|Metroman E Sreedharan has denied reports that he will be the administrator of Lakshadweep

    लक्षद्विपचे प्रशासक बनणार असल्याच्या वृत्ताचा मेट्रोमॅन ई श्रीधरन यांनी केला इन्कार

    लक्षद्वीपच्या प्रशासकपदी नियुक्ती होणार असल्याच्या वृत्तीचा भारतीय जनता पक्षाचे नेते मेट्रोमॅन ई श्रीधरन यांनी इन्कार केला आहे. लक्षद्वीपमध्ये सध्याचे प्रशासक प्रफुल्ल खोेडा पटेल यांच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर श्रीधरन यांची प्रशासकपदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा होती.Metroman E Sreedharan has denied reports that he will be the administrator of Lakshadweep


    विशेष प्रतिनिधी

    तिरुअनंतपूरम : लक्षद्वीपच्या प्रशासकपदी नियुक्ती होणार असल्याच्या वृत्तीचा भारतीय जनता पक्षाचे नेते मेट्रोमॅन ई श्रीधरन यांनी इन्कार केला आहे.

    लक्षद्वीपमध्ये सध्याचे प्रशासक प्रफुल्ल खोेडा पटेल यांच्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर श्रीधरन यांची प्रशासकपदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा होती.

    प्रफुल्ल खोडा पटेल यांनी लक्षदीपचे प्रशासक म्हणून काही नियमांत बदल करणार असल्याचे सुतोवाच केले होते. त्यामुळे सेव्ह लक्षद्वीप नावाने मोहीम सुरू झाली आहे.



    त्यामुळे प्रफुल्ल खोडा पटेल यांच्या जागी श्रीधरन यांची नियुक्ती होण्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, श्रीधरन यांनी त्याचा इन्कार केला आहे.
    श्रीधरन म्हणाले, मला भारतीय जनता पक्षाच्या कोणाही नेत्याकडू अथवा केंद्रीय मंत्र्याकडून अद्याप तरी अशा प्रकारचा निरोप आलेला नाही.

    त्यामुळे ही चर्चा सुरू असल्याची कोणतीही कल्पना आपल्याला नाही. मी देखील माध्यमांमधून या या बातम्या पाहत आहे. मात्र, त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही.

    प्रफुल्ल खोडा पटेल हे सध्या लक्षद्वीपचे प्रशासक आहेत. त्यांनी लक्षद्वीपच्या कायद्यात काही बदल प्रस्तावित केले आहेत. यामध्ये तीन अपत्य असणाºयांना सरकारी नोकरी किंवा निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात येणार आहे.

    त्याचबरोबर लक्षद्वीपमध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येणार नाही. तसेच या ठिकाणी असलेली दारूबंधीही उठविण्यात येणार नाही.प्रफुल्ल खोडा पटेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात. गुजरातचे गृह मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

    गेल्या अनेक दिवसांपासून लक्षद्वीपच्या नागरिकांनी पटेल यांच्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. त्यांना परत पाठविण्याची मागणी केली आहे. केरळ विधानसभेतही खोडा पटेल यांच्याविरोधात प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे श्रीधरन यांच्या नियुक्तीची चर्चा सुरू झाली आहे.

    Metroman E Sreedharan has denied reports that he will be the administrator of Lakshadweep

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य