• Download App
    भारतातून मी पळून गेलेलोच नाही, फरार आरोपी चोक्सीची बहाणेबाजी सुरुच।Mehul Choksi gave anothes reason

    भारतातून मी पळून गेलेलोच नाही, फरार आरोपी चोक्सीची बहाणेबाजी सुरुच

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतातून मी पळून गेलो नाही तर वैद्यकीय उपचारांसाठी देश सोडला, असा दावा फरार आरोपी मेहुल चोक्सीने केला आहे. भारत सोडला तेव्हा माझ्यावर देश सोडून जाण्यासंबंधी कोणतेही वॉरंट निघाले नव्हते, असे सांगत जर जामीन मिळाला तर तो डोमिनिका सोडून कोठेही जाणार नाही, असेही त्याने स्पष्ट केले. Mehul Choksi gave anothes reason

    चोक्सी आता भारतात येणे टाळण्यासाठी नवे-नवे बहाणे शोधत आहे. आता त्याने अँटिग्वा पोलिसांना लेखी तक्रार केली असून त्याला मारहाण करून जबरदस्तीने डोमिनिकाला नेल्याचा दावा केला आहे. या अपहरणात त्याची मैत्रीण बारबरा जाबेरिका हिचा हात असल्याचे व मारहाण करणारे अँटिग्वा पोलिसांचे लोक असल्याचेही त्याने म्हटले आहे.



    चोक्सीने तक्रार अर्जात म्हटले आहे की, गेल्या एक वर्षांपासून मी बारबरा जाबेरिकाबरोबर मित्राप्रमाणे अँटिग्वात राहत होतो. तिच्या सांगण्यावरून २३ मे रोजी मी तिच्या घरी पोचले तेव्हा ८-१० लोक आले आणि मला बेदम मारहाण केली. ते पोलिसांचे लोक असल्याचा दावा करीत होते. ज्यावेळी मला मारहाण होत होती तेव्हा बारबराने मला काही मदत केली नाही. यावरुन माझ्या अपहरणाच्या कारस्थानात तिचा सहभाग असल्याचे सिद्ध होत असल्याचे चोक्सी म्हणाला.

    Mehul Choksi gave anothes reason

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!