विशेष प्रतिनिधी
श्रीनगर: जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपविरुध्द द्वेषयुक्त फुत्कार केला आहे. उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव होणे ब्रिटिशांपासनू स्वातंत्र्य मिळविण्यापेक्षा मोठी बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.Mehbooba Mufti’s hate speech against BJP, BJP’s defeat in Uttar Pradesh is more important than gaining independence from British
मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, भाजपवाले समाजातील विविध समुदायांमध्ये द्वेषाची भावना पसरवत असून, ते इंग्रजांपेक्षेही वाईट आहे. उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव होणे म्हणजे ब्रिटिशांपासून मिळालेल्या स्वातंत्र्यापेक्षाही मोठी बाब आहे.
भाजपच्या कार्यकाळात जम्मू आणि काश्मीर सुरक्षित नाही. सत्ताधारी भाजपने विरोधकांना घाबरवण्यासाठी, त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला. मात्र, देशातील तरुण वर्गाने न डगमगता, न घाबरता देशभरात मैत्रीची भावना समृद्ध करायला हवी आणि आव्हानांना निडरपणे सामोरे जावे.
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे त्यांना (भाजप) औरंगजेब आणि बाबर आठवत आहेत असे सांगून मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, भाजपला हुसकावून लावण्याची संधी मिळाली आहे. १९४७ च्या भारताच्या स्वातंत्र्यापेक्षा ही मोठी आझादी असेल कारण त्यांना देशाची फाळणी करायची होती.
Mehbooba Mufti’s hate speech against BJP, BJP’s defeat in Uttar Pradesh is more important than gaining independence from British
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई : राणीच्या बागेत नुकतच झालय एका नवीन पाहुण्याचं आगमन , वाघिणीच्या बछड्याच महापौर किशोरी पेडणेकर यांच्याहस्ते नामकरण
- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : हवाई दलाच्या ७५ विमानांची अनोखी मानवंदना राजपथ अनुभवणार!!
- शिवसेना – राष्ट्रवादी महाराष्ट्रात काँग्रेस कमजोर करताहेत; काँग्रेस नेत्याचे सोनियांना पत्र!!