विशेष प्रतिनिधी
जम्मू : माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांना काश्मीर विभागातील श्रीनगरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. शोपियां जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या काश्मिरी पंडितांची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्या आज रवाना होणार होत्या. असे सांगण्यात येत आहे. यापूर्वी पोलिसांनी त्यांना श्रीनगरमध्ये नजरकैदेत ठेवले. Mehbooba Mufti in custody in Srinagar
मेहबूबा मुफ्ती यांच्या ट्विटर हँडलवरून यासंबंधीचे एक ट्विटही करण्यात आले आहे. त्यात लिहिले होते, ‘आज मला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे, कारण मला शोपियांमधील काश्मिरी पंडितांच्या कुटुंबाला भेटायचे होते. केंद्र सरकार काश्मिरी लोक आणि पंडितांच्या पलायनाबद्दल जाणूनबुजून खोटा प्रचार करत आहे आणि सरकारला खोट्या फूट पाडणाऱ्या गोष्टींचा पर्दाफाश होऊ द्यायचा नाही.
सोमवार, 4 मार्च रोजी जिल्ह्यातील छोटीगाम जिल्ह्यात काश्मिरी पंडित दुकानदार बाल कृष्ण भट यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ला करून जखमी केले. बाल कृष्ण यांचे कुटुंब मेडिकल स्टोअर चालवते. त्याच्या दुकानाबाहेर दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घातल्या.