• Download App
    वैद्यकीय प्रवेश परीक्षा पुढे ढकलली ; कोरोना संक्रमण, रुग्णवाढीमुळे निर्णय Medical entrance exam postponed

    वैद्यकीय प्रवेश परीक्षा पुढे ढकलली ; कोरोना संक्रमण, रुग्णवाढीमुळे निर्णय

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केंद्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे आणि रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट पीजी 2021 परीक्षा पुढे ढकलली आहे. या बाबतची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. Medical entrance exam postponed

    वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले, ही परीक्षा यापूर्वी 18 एप्रिल रोजी घेण्याचे निश्चित केले होते.



    परंतु, देशात आणि राज्यात कोरोनाचे संक्रमण आणि रुग्ण वाढत असल्याने परीक्षा पुढे ढकलली असून परीक्षेची नवी तारीख जाहीर केली जाईल. केंद्र सरकारने यापूर्वी सिबीएससी परीक्षा पुढे ढकलली होती. त्यानंतर आता वैद्यकीय प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे.


    इतर बातम्या

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!