MEA Press Conference Over Afghanistan Situation : अफगाणिस्तानात तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. भारत, अमेरिकेसह विविध देश आपल्या नागरिकांना लवकरात लवकर परत आणण्यात गुंतले आहेत. केंद्र अफगाणिस्तानमधील ताज्या परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, सरकारने काबूल किंवा दुशान्बे येथून 550 हून अधिक लोकांना सहा वेगवेगळ्या फ्लाइटद्वारे बाहेर काढले आहे. यापैकी 260 हून अधिक भारतीय नागरिक होते. MEA Press Conference Over Afghanistan Situation Amid Taliban Taking Control And Evacuation Of Indian Nationals From Kabul
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अफगाणिस्तानात तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. भारत, अमेरिकेसह विविध देश आपल्या नागरिकांना लवकरात लवकर परत आणण्यात गुंतले आहेत. केंद्र अफगाणिस्तानमधील ताज्या परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, सरकारने काबूल किंवा दुशान्बे येथून 550 हून अधिक लोकांना सहा वेगवेगळ्या फ्लाइटद्वारे बाहेर काढले आहे. यापैकी 260 हून अधिक भारतीय नागरिक होते.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, “भारत सरकारने इतर एजन्सींच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यात मदत केली आहे. आम्ही अमेरिका, ताजिकिस्तान सारख्या विविध देशांच्या संपर्कात होतो. ”ते म्हणाले की, आतापर्यंत बहुतेक भारतीयांना बाहेर काढण्यात आले आहे.
‘आतापर्यंत किती भारतीयांना बाहेर काढण्यात आले?’
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही (अफगाणिस्तानमधील) परिस्थितीचे अत्यंत काळजीपूर्वक निरीक्षण करत आहोत. ही एक नवी परिस्थिती आहे. अफगाणिस्तानातून आतापर्यंत किती भारतीयांना बाहेर काढण्यात आले आहे? या प्रश्नावर अरिंदम बागची म्हणाले की, संख्या बदलत राहते, कारण ज्यांनी देश सोडण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला त्यांच्याबद्दल आम्हाला नवीन माहिती मिळते. सध्या तेथे राहू इच्छिणारे भारतीय असू शकतात. काही असे आहेत जे इतर देशांमध्ये गेले आहेत. काही आमच्या भागीदारांच्या मदतीनेही बाहेर गेले आहेत. आमच्या मूल्यमापनानुसार ज्या भारतीयांना परत यायचे होते त्यातील बहुतांश जणांना बाहेर काढण्यात आले आहे. आणखी काही अफगाणिस्तानात असण्याची शक्यता आहे. माझ्याकडे अचूक संख्या नाही.
भारताने अफगाणिस्तानातून इतर देशांच्या नागरिकांनाही बाहेर काढले
बागची म्हणाले की, आम्ही काही अफगाण नागरिकांना तसेच इतर देशांच्या नागरिकांना बाहेर काढण्यात यशस्वी झालो आहोत. यापैकी बरेच शीख आणि हिंदू होते. प्रामुख्याने, आमचे लक्ष भारतीय नागरिकांवर असेल, परंतु आम्ही आमच्या बाजूने उभ्या असलेल्या अफगाणिस्तानी नागिरकांच्याही पाठीशी उभे राहू. आम्ही शांततापूर्ण, समृद्ध, लोकशाही असणाऱ्या अफगाणिस्तानची मागणी करत आहोत. सध्या आम्ही परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहोत. सध्याचे लक्ष अफगाणिस्तानातून बाहेर काढण्याच्या सुरक्षेच्या स्थितीवर आहे आणि हे कसे पूर्णत्वास जाईल, हे पाहणे आहे. इतर देशही वेट अँड वॉचच्या स्थितीत आहेत.
MEA Press Conference Over Afghanistan Situation Amid Taliban Taking Control And Evacuation Of Indian Nationals From Kabul
महत्त्वाच्या बातम्या
- Corona Vaccination : कोरोनाविरुद्ध लसीकरणाचा देशात नवा विक्रम, एका दिवसात ९३ लाखांहून जास्त डोस दिले
- दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने महाविद्यालय, वाजपेयी-जेटली यांच्या नावांनीही केंद्रांची उभारणी
- ओबीसी राजकीय आरक्षण बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्या सूचना… कोणत्या?… त्या वाचा…!!
- देशाचा जीडीपी 9.5% राहण्याचा अंदाज, महागाईसुद्धा कमी होणार – RBI गव्हर्नर शक्तिकांत दास
- Sarada Scam : शारदा घोटाळ्याच्या आरोपपत्रात तृणमूल सरचिटणीस कुणाल घोष यांचे नाव, घोष म्हणाले- केंद्राकडून सूड भावनेने कारवाई