प्रतिनिधी
लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये आज झालेला मेळावा बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावतींचा आहे? की सत्ताधारी झाली भाजपचा आहे??, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण स्टेजवर गणेश प्रतिमा, शंख, त्रिशूळ, विविध मंत्रांचे उच्चार यांची रेलचेल होती.Mayawati’s rally or BJP’s The question arises … because Ganesh, conch, trident and Jai Shriram on stage … !!
आत्तापर्यंत हिंदू धर्माची ही सर्व प्रतिके भाजपने वापरली आहेत. ती आज मायावतींच्या ब्राह्मण प्रबुद्ध मेळाव्यात दिसून आली. इतकेच नाही तर माझ्यावर तुमच्या स्टेजवर त्यांच्यासमोर मोठमोठ्याने जय श्रीरामचे नारेही ही लावण्यात आले…!!
“जय श्रीराम” हा तर असा बुलंद नारा आहे, की ज्याने 2 खासदारांच्या भाजपला 303 खासदार देऊन प्रचंड बहुमताने केंद्रातल्या सत्तेवर आणले आहे. किंबहुना भाजपची राजकीय नाव या राम नामानेच देशाच्या राजकारणात तरली आहे. आज “जय श्रीराम” ही घोषणा भाजपच्या नव्हे, तर मायावतींच्या स्टेजवरून दिली गेल्याने या घोषणेची राजकीय व्याप्ती जणू आता पक्षीय भेदांच्या पलिकडे गेल्याचे दिसून आले आहे.
उत्तर प्रदेशातील ब्राह्मण प्रबुद्ध मेळाव्याची सुरुवात मायावतींचे उजवे हात ब्राह्मण नेते सतीश चंद्र मिश्रा यांनी केली होती. आज त्याचा समारोप मायावती यांच्या भाषणाने झाला. त्यामध्ये मायावतींनी ब्राह्मण समाजाला सुरक्षिततेचे आश्वासन दिले. त्याच बरोबर इथून पुढच्या काळात नुसत्या स्मारकांच्या बांधणीवर भर देणार नसून उत्तर प्रदेशाच्या विकासावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याच वेळी मायावतींनी यातून आपल्या “राजकीय सुटकेचा” प्रयत्न ही करून घेतला.
एखाद्या समाजाला आपल्या संतांचा आदर करायचा असेल, स्मारक उभारायचे असेल तर बहुजन समाज पक्षाचे सरकार ते स्मारक जरूर बांधून देईल, असे सांगून मायावतींनी ब्राह्मण समाजासह अन्य जातीच्या समूहांनाही चुचकारले.
मायावतींच्या भाषणापूर्वी ब्राह्मण प्रबुद्ध मेळाव्यात विविध मंत्रांचे पठण करण्यात आले. शंख वाजवण्यात आले. मायावती यांना गणेश प्रतिमा, त्रिशूळ आणि चांदीचा हत्ती भेट देण्यात आले. आत्तापर्यंत हिंदू धर्मात पवित्र मानली गेलेली ही सर्व प्रतिके भाजपच्या मेळाव्यांमध्ये वापरली जायची. ती आता उघडपणे मायावतींच्या मेळाव्यात वापरण्यात आली आहेत. मायावतींच्या प्रबुद्ध ब्राह्मण मेळाव्यांवर भाजपने ब्राह्मण समाजाच्या लांगूलचालनाचा आरोप केला आहे.
Mayawati’s rally or BJP’s The question arises … because Ganesh, conch, trident and Jai Shriram on stage … !!
महत्त्वाच्या बातम्या
- दाभोलकर हत्या प्रकरणी आता 15 सप्टेंबरला दोषारोपपत्र, कोरोनामुळे न्यायालयाकडून आरोपींना मुदतवाढ
- उत्तर प्रदेशच्या निवडणुकांबद्दल ओवैसींचा मोठा दावा, म्हणाले – 100 जागा लढू आणि जिंकू, इतर पक्षांवर केली आगपाखड
- मायावतींच्या सभेत दिसले शंख, गणपती, त्रिशूल अन् जय श्रीराम; म्हणाल्या, दलितांवर पूर्ण विश्वास, प्रबुद्ध वर्गाच्या मदतीनेच पूर्ण बहुमताचे सरकार!
- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावाचे देशभर काँग्रेसकडून वेगळे आयोजन; केंद्र सरकारच्या कार्यक्रमांना “राजकीय काटशह”