• Download App
    भाजपच्या डावपेचापासून सावध राहा - मायावती यांनी साधला निशाणा|Mayawati targets BJP in UP

    भाजपच्या डावपेचापासून सावध राहा – मायावती यांनी साधला निशाणा

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ – केवळ घोषणा, भूमिपूजन आणि अर्धवट प्रकल्पांचे उद्‌घाटन करून उत्तर प्रदेशात भाजपचा पाया मजबूत होणार नाही, अशी टीका बसप प्रमुख मायावती यांनी केली. पंभाजपच्या डावपेचांपासून सावध राहण्याचे आवाहनही त्यांनी जनतेला केले.Mayawati targets BJP in UP

    त्या म्हणाल्या, की विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकार एकामागून एक घोषणा करीत आहे. पायाभरणी समारंभ आणि अर्धवट प्रकल्पांच्या उद्‌घाटनाची मालिकाच सुरू झाली आहे. मात्र, यामुळे भाजपचा पाया विस्तारणार नाही.



    राज्यातील जनतेलाही याची पूर्ण कल्पना आहे. पूर्वांचल प्रदेशातून बसपमधून हाकालपट्टी केलेल्या ब्राम्हण नेत्यांना समाजवादी पक्षाने प्रवेश दिला आहे. त्यासंदर्भात बोलताना मायावती म्हणाल्या,

    की इतर पक्षांतून हाकालपट्टी केलेल्या स्वार्थी नेत्यांना प्रवेश दिल्याने विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाचा फायदा होणार नाही. मतदार अशा नेत्यांवर ‘आयाराम-गयाराम’ शब्दांत टीका करतात.

    Mayawati targets BJP in UP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र