• Download App
    हिंदूंवर 800 वर्षे राज्य केल्याची वल्गना करणारा मौलवी फारूख आता माफी मागतोय!!Maulvi Farooq, who had ruled over Hindus for 800 years, is now apologizing

    The Kashmir Files : हिंदूंवर 800 वर्षे राज्य केल्याची वल्गना करणारा मौलवी फारूख आता माफी मागतोय!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : “द काश्मीर फाईल्स” सिनेमाच्या मुद्द्यावर हिंदूंविरोधात धमकी भरली भाषणे ठोकणारा राजौरीच्या जामिया मशिदीचा मौलवी फारुख आता माफी मागायला लागला आहे. मौलाना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, संपूर्ण देशातून मौलाना विरोधात संतप्त आवाज उठला. त्यानंतर मौलानांनी माघार घेऊन माफी मागितली आहे. Maulvi Farooq, who had ruled over Hindus for 800 years, is now apologizing

    मौलाना फारुखने “द काश्मीर फाईल्स” या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही तो या व्हिडिओत करताना दिसत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, देशभरात मौलवी फारूख विरोधात संतापाची लाट उसळली. त्यानंतर मौलवीने माफी मागितली आहे. लोकांच्या रोषाला आणि कायदेशीर पेचांना घाबरून माफी मागणाऱ्या या मौलवीने आपण कोणत्याही समाजाच्या नव्हे, तर सरकारविरोधात वक्तव्य केल्याचे म्हटले आहे.

     

    मौलवीचे स्पष्टीकरण

    या व्हिडिओनंतर कायदेशीर कारवाईच्या भीतीने मौलवीने आणखी एक व्हिडिओ जारी करून आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. काश्मीर फाईल्स नावाने बनवण्यात आलेल्या चित्रपटात काश्मीरी पंडितांवर झालेला अत्याचार दाखवण्यात आला आहे. अशा प्रकारच्या चित्रपटांमुळे समाजातील ऐक्य बिघडते. माझ्या धार्मिक भाषणात मी सरकारकडे चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. आमचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही. त्यापेक्षा मी म्हणतो काश्मिरी पंडित हे जम्मू-काश्मीरची शान आणि अभिमान आहेत. त्यांच्याशिवाय हे राज्य अपूर्ण आहे. कोणत्याही धर्माबद्दल माझे कोणतेही विधान नाही. माझे विधान समजून घेण्यात चूक झाली. माझे धार्मिक भाषण कोणत्याही जाती किंवा धर्माविरोधात नव्हते, तर सरकारच्या विरोधात होते, असं स्पष्टीकरण मौलवींनी दिले आहे.

    “द काश्मीर फाईल्स”वर बंदी घालायला हवी. आम्ही 800 वर्षांपासून तुमच्यावर सत्ता गाजवली आहे. ती तुम्ही 70 वर्षांत मिटवण्याचा प्रयत्न करत आहात. अगदी अशाचप्रकारे काश्मीरमधून काश्मिरी हिंदुंचे अस्तित्व संपवण्यात आल्याचे या मौलवींनी आपल्या व्हिडिओत म्हटले होते.

    Maulvi Farooq, who had ruled over Hindus for 800 years, is now apologizing

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य