वृत्तसंस्था
मुजफ्फरनगर – उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील एका गावात तिसरे लग्न करू पाहणाऱ्या मौलवीची त्याच्याच दुसऱ्या पत्नीने सुरा भोसकून हत्या केली. वकील अहमद असे या ७७ वर्षीय मौलवीचे नाव असून त्याची आधी दोन लग्ने झाली होती. त्याला पहिल्या पत्नीपासून ५ मुली आहेत. त्यातील चौघींची लग्ने झाली आहेत. तरीही मौलवी वकील अहमदला तिसरे लग्न करायचे होते. यावरून त्याची पत्नी हाजराशी त्याचा वाद झाला. या वादाच्या भरात पत्नी हाजराने त्याला सुऱ्याने भोसकले आणि त्याच्या गुप्तांगावर वार केले. यामध्ये मौलवीचा अतिरक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला. maulavi vakil ahamad was murdered by his first wife for his alleged third marriage
परवा सायंकाळी मुजफ्फरनगरमधील भौरकला पोलीस स्टेशन परिसरातील शिकारपूर गावात ही घटना घडली. मौलवीने तिसरे लग्न करू नये. त्याने आपल्या मुलींची लग्ने करून द्यावीत, असा आग्रह हाजराने धरला होता. पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पत्नी हाजराने त्याला भोसकले. यामध्ये मौलवीचा मृत्यू झाला. पोलिसांनी हाजराला अटक केली आहे.
हाजराने तिच्या नातेवाईकांच्या मदतीने मौलवीचे अंतिम संस्कार करण्याचा प्रयत्न केला. शेजारच्यांना याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केल्यावर तिने गुन्ह्याची कबुली दिली.
मौलवी वकील अहमदने यापूर्वीच दोन विवाह केले होते. हाजरा ही त्याची पहिली पत्नी आहे. त्यांना ५ मुली असून त्यातील ४ जणींचे लग्न झाले आहे. मौलवीनेही दुसरे लग्न केल्यानंतर दुसऱ्या पत्नीने सहा महिन्यांनी त्याला सोडून दिले. त्यानंतर मौलवीने तिसऱे लग्न करण्याचा आग्रह धरला होता. त्यावर हाजराने आपल्या अविवाहित मुलीचे आधी लग्न कर असे सांगितले. यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. रात्री मौलवी झोपेत असताना हाजराने स्वयंपाकघरातील सुऱ्याने त्याच्या गुप्तांगावर वार करून भोसकले. पोलिसांनी हाजराला अटक केली असून तिला तुरुंगात पाठवले आहे.
maulavi vakil ahamad was murdered by his first wife for his alleged third marriage
महत्त्वाच्या बातम्या
- शेतकरी आंदोलनाविषयी गुप्तचर यंत्रणा सतर्क, पाकिस्तानी ISI करू शकते हिंसा भडकवण्याचा प्रयत्न
- कौतुकास्पद ! स्वप्नांना पंख ! नांदेडच्या शिरपेचात मानाचा तुरा;कोंढ्याच्या 14 वर्षीय लेकीची गगनभरारी;अमेरिकेत उडवलं विमान !
- जनक… आरक्षणाचे, सहकाराचे, शिक्षण क्रांतीचे अन् समाज परिवर्तनाचे!
- कोरोना चाचणीचे कीट फक्त ५० रुपयांत; आयआयटी दिल्लीच्या संशोधकांची निर्मिती
- Corona Vaccine : कोरोनापासून बचावासाठी दरवर्षी ‘बूस्टर डोस’ आवश्यक ;जागतिक आरोग्य संघटनेकडून स्पष्ट