वृत्तसंस्था
नवी दिल्ली : विश्वचषक १९८३ वर आधारित ‘83’ हा चित्रपट पाहून मास्टर ब्लास्टर भारावला असून त्याने चित्रपटासह कपिलदेवाची भूमिका साकारणारा अभिनेता रणवीर सिंहचे तोंड भरून कौतुकही केले आहे. Master Blaster’ Sachin Tendulkar Praise for Ranveer Singh with ’83’ movie
अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांची ’83’ या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट सचिनने सुद्धा नुकताच पहिला आणि तो भारावून गेला. तो म्हणाला, 83 मध्ये रणवीर सिंहचा एक छान सुंदर असा अष्टपैलू परफॉर्मन्स. खरोखरच कपिल देव खेळत असल्याचा भास या चित्रपटात होतो. आपल्या पहिल्या विश्वचषक विजयाच्या प्रतिष्ठित क्षणांची आठवण झाली. मला माहित आहे की, या विजयाने त्या लहान मुलाला खरोखर प्रेरणा दिली.
विशेष म्हणजे या चित्रपटात सचिन तेंडुलकरचीही झलक पाहायला मिळत आहे. एक लहान मुलगा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाच्या विजयाचा आनंद लुटताना दाखवला आहे. तो कुरळ्या केसांचा हा मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून सचिन आहे. त्यानंतर सचिन तेंडुलकरचा क्रिकेटमधील प्रवास सर्वांनाच माहिती आहे. त्याचे देशासाठीही मोठे योगदान सर्वांना माहिती आहे.
दरम्यान सचिनने चित्रपटाचे कौतुक केल्यानंतर रणवीरनेही त्याची ही कमेंट रिट्विट केली आहे. रणवीर सिंह म्हणाला की, “…आणि मग तो लहान मुलगा पुढे अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहिला. धन्यवाद, मास्टर! माझ्यासाठी याचा अर्थ खूप महत्त्वपूर्ण आहे.”