विशेष प्रतिनिधी
जम्मू – जम्मू-काश्मीकर आणि हिमाचल प्रदेशावर देखील अतिवृष्टीचे संकट कोसळले असून विविध ठिकाणांवर ढगफुटीमुळे झालेल्या भूस्खलनाने मोठी जिवीत व वित्तहानी झाली आहे.Massive rain in Jammu Kashmir and Himachal pradesh
या अतिवृष्टीची माहिती मिळताच ‘एनडीआरएफ’च्या तुकड्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून अनेक ठिकाणांवर मदत आणि बचाव कार्याला वेग आला आहे. काही ठिकाणांवर ढिगारे हटविण्याच्या कामाला वेग आला आहे.
हिमाचल प्रदेशात विविध ठिकाणांवर ढगफुटीसदृश्यग पाऊस कोसळल्याने पूर येऊन नऊजणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून अन्य सात जण बेपत्ता आहेत. उदयपूर भागामध्ये तोझिंग नुल्लाह येथे ढगफुटी झाल्याने लाहौल स्पिती येथे आलेल्या पुरात सात जण वाहून गेले.
चंबा जिल्ह्यामध्ये दोघाजणांचा मृत्यू झाल्याचे समजते. कुलू जिल्ह्यामध्ये चारजण मरण पावल्याची शक्यता वर्तविली जात असून यामध्ये दिल्लीतील एका पर्यटकासह जलविद्युत प्रकल्पावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
उदयपूरमध्ये बारा कामगार वाहून गेल्याची भीती वर्तविली जात आहे. लाहौल-स्पितीमध्ये अनेक रस्त्यांचे मोठे नुकसान झाले असून विविध ठिकाणांवर भूस्खलन झाल्याने साठपेक्षाही अधिक वाहने अडकून पडल्याचे वृत्त आहे.
Massive rain in Jammu Kashmir and Himachal pradesh
महत्त्वाच्या बातम्या
- बालकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी केंद्राने संसदेने मंजूर केले बाल न्याय सुधारणा विधेयक
- जगभर ढोल वाजवलेले कोरोनाविरुद्धचे केरळ मॉडेल अपयशी ठरतंय..? आकडेवारी तरी तसेच सांगतेय…
- छत्तीसगडचे आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्री आमने-सामने, मुख्यमंत्रीपदाबाबत बदलाच्या चर्चेनंतर कॉँग्रेस आमदाराकडूनच आरोग्य मंत्र्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप
- CRPF Recruitment 2021 : CRPF मध्ये अधिकारी होण्याची सुवर्ण संधी ; त्वरीत करा अर्ज-उद्या शेवटची तारिख