• Download App
    गंगा, यमुनेने धोक्याची पातळी ओलांडली, उत्तर प्रदेशात लाखो लोकांच्या मनात धडकी|Massive flood to river ganga and jamuna in Up

    गंगा, यमुनेने धोक्याची पातळी ओलांडली, उत्तर प्रदेशात लाखो लोकांच्या मनात धडकी

    विशेष प्रतिनिधी

    लखनौ – उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे गंगा आणि यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. फाफामऊ येथे गंगा नदीची पातळी ८५.३१ मीटरवर पोचली आहे तर नैनो येथे यमुना नदीची पातळी ८५.१८ मीटरवर आहे. दोन्ही नद्या धोक्याची पातळी ८४.७३ मीटरपेक्षा अधिक उंचीवरून वाहत आहेत.Massive flood to river ganga and jamuna in Up

    दोन्ही नद्यांची पातळी वाढल्याने किनाऱ्यालगत असलेले लहान मोठे भाग तसेच सलोरी, राजापूर, अशोकनगरपर्यंत पाणी पोचले आहे. त्यामुळे लोकांना गच्चीवर राहावे लागत आहे. यादरम्यान बचावकार्य जोरात सुरू असून एनडीआरएफकडून पूरग्रस्त भागातील नागरिकांना घर सोडण्याचे आवाहन केले जात आहे.



    नदीची वाढती पातळी लक्षात घेता नागरिकांना तत्काळ घर सोडण्याचे आवाहन केले जात आहे. नद्यांना पूर आल्यामुळे हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागत आहे. शेकडो घरांचा पहिला मजला पाण्याखाली गेला आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. काही दिवसांपूर्वी ज्या रस्त्यावरून वेगाने वाहने धावत होती, तेच रस्ते पाण्याखाली गेल्याने आता नौका जात आहेत.

    ग्रामीण भागाचा शहरी भागाशी संपर्क तुटला आहे. संगमकडे जाणारे रस्ते सुमारे पाण्याखाली गेले आहेत. गंगा नदीकिनाऱ्यावर कछारी भागात भाड्याने राहणारे विद्यार्थी देखील पाण्यात अडकले असून ते पहिल्या मजल्यावर राहत आहेत.

    Massive flood to river ganga and jamuna in Up

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    OBC reservation : ओबीसींना कमी आरक्षण मिळाले; OBC महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवडे यांचा इलेक्शन कमिशनवर आरोप, कोर्टात जाण्याचा इशारा

    Rohini Acharya : लालूंना किडनी देणाऱ्या रोहिणींनी राजकारण सोडले; कुटुंबाशी संबंध तोडले; लिहिले- तेजस्वींच्या सल्लागाराने असे करायला सांगितले

    India Russia : रशियन कच्च्या तेलाचा भारत दुसरा सर्वात मोठा खरेदीदार; ऑक्टोबरमध्ये ₹22.17 हजार कोटींची आयात झाल