आग कशी लागली याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ग्रेटर नोएडा येथील गॅलेक्सी शॉपिंग प्लाझामध्ये भीषण आग लागली. आग लागल्याचे समजताच मॉलमध्ये एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी लोकांनी घाईघाईत तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याचे समोर आले आहे. Massive fire at Galaxy Plaza in Greater Noida People jumped from the third floor to save their lives
तर आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग कशी लागली याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मॉल व्यवस्थापनाने अद्याप याला दुजोरा दिलेला नाही.
एमसीबीजवळ जोरदार ठिणगी पडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर धुराचे लोट आणि काही वेळातच आग पसरू लागली. मिळालेल्या माहितीनुसार, ही आग दुपारी दोनच्या सुमारास लागली. बिसरख पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शॉपिंग मॉलला आग लागली आहे.
एप्रिल 2023 मध्ये ग्रेटर नोएडाच्या गौर सिटीत भीषण आग लागली होती. तेथील एका टॉवरला आग लागल्याने आग लागल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलाच्या गाड्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. टॉवरला आग लागल्याने त्यावेळीही मोठा गोंधळ उडाला होता.
Massive fire at Galaxy Plaza in Greater Noida People jumped from the third floor to save their lives
महत्वाच्या बातम्या
- बंगाल पंचायत निवडणुकीचा निकाल : तृणमूल काँग्रेसने जिंकल्या 18,606 ग्रामपंचायतींच्या जागा; भाजपला 4,482; ओवेसींच्या पक्षाला 3 जागा
- बंगळुरूमध्ये एरोनिक्स इंटरनेट कंपनीच्या ‘सीईओ’ आणि ‘एमडी’ची तलवारीने वार करू हत्या! माजी कर्मचाऱ्यावर आरोप!
- काँग्रेस चालणार बस यात्रा वाट; आघाडीची “वाट” लावोनिया!!
- GST Council meeting :ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रेसिंग, कॅसिनोवर आता २८ टक्के जीएसटी;, चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थ स्वस्त