• Download App
    Maoists out for support of banned PFI

    प्रतिबंधित PFI च्या समर्थनासाठी माओवादी बाहेर; फॅसिस्ट हिंदुत्ववादी मुस्लिमांना उद्ध्वस्त करत असल्याचा कांगावा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशभरात घातपाती कारवाया करण्यासाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFI वर बंदी घातल्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी या बंदीचे समर्थन केले असले, तरी माओवाद्यांनी मात्र आता उघडपणे बाहेर येऊन PFI चे समर्थन केले आहे. इतकेच नाही, तर पी एफआय वर घातलेली बंदी हे मुसलमानांचे अपराधीकरण करून त्यांना उध्वस्त करण्याचे फॅसिस्ट हिंदुत्ववाद्यांचे कारस्थान आहे, असा कांगावाही केला आहे. भारत कम्युनिस्ट पक्ष माओवादी याच्या अधिकृत लेटरहेडवर याविषयीचे पत्रक काढले आहे. Maoists out for support of banned PFI

    पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया वर बंदी घालताना ब्राह्मणी हिंदुत्ववादी सरकारने तीन कारणे दिली आहेत. ती म्हणजे पीएफआय घातपाती कारवाया करते. त्यासाठी टेरर फंडिंग करते. पीएफआय मध्ये असामाजिक तत्व आहेत, जी तत्वे समाजात तेढ पसरवतात आणि पीएफआय चे धागेदोरे प्रदेशात आहेत. परंतु ही तीनही कारणे खोटी असून हे ब्राह्मणी हिंदुत्ववाद्यांचे कारस्थान आहे. मुस्लिम समाजाचे अपराधीकरण झाल्याचे दाखवून त्या समाजाला उध्वस्त करण्याचा हा सरकारचा डाव आहे, असा कांगावा माओवाद्यांनी केला आहे.

    पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांबरोबर माओवादी देखील या बंदी विरोधात संघर्ष करतील आणि ही बंदी हाणून पाडतील, अशी धमकी या पत्रकातून सरकारला दिली आहे.

    दोन संघटनांच्या कार्यपद्धतीत समानता

    पीएफआय आणि माओवादी या दोघांच्या कार्यपद्धतीत समानता आहे. पीएफआय सारखी संघटना देशात यादव युद्ध भडकवून 2047 पर्यंत भारताचे रूपांतर इस्लामी देशात करण्याचे कारस्थान रचत होती, तर माओवादी मात्र संपूर्ण देशात अराजक पसरवून येथे हिंसक कम्युनिस्ट राजवट लादण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर त्यांनी शहरी नक्षलवाद आणि प्रत्यक्ष नक्षलवादी कारवाया यांना समर्थन केले आहे.

    Maoists out for support of banned PFI

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Zeeshan Siddiqui : झीशान सिद्दिकी यांना पुन्हा एकदा आल्या जीवे मारण्याच्या धमक्या!

    काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर गोळीबार; पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियातून अमित शाहांना दिल्या कठोर कारवाईच्या सूचना!!

    Gold price : सोन्याच्या किमतींनी रचला नवा इतिहास, पहिल्यांदाच १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख रुपयांच्या पुढे गेला