• Download App
    ग्राहकांना घरबसल्या दारु पोहोचवण्यासाठी विविध राज्ये सरसावली, काही राज्यांनी बनविली सरकारी ॲप।Many states made apps for liqer home delivery

    ग्राहकांना घरबसल्या दारु पोहोचवण्यासाठी विविध राज्ये सरसावली, काही राज्यांनी बनविली सरकारी ॲप

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीतील नागरिकांना आता घरबसल्या दारु मागवता येणार आहे. सरकारने याबाबतची परवानगी दिली आहे. घरबसल्या ऑनलाइन ऑर्डर दिल्यास काही वेळातच दारुची होम डिलिव्हरी केली जाईल. दिल्लीच्या अगोदर महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक,पंजाब, झारखंड, पश्चिाम बंगाल, केरळ, ओडिशा येथे घरपोच दारु पोचवण्याची सेवा दिली जात आहे. छत्तीसगड, केरळ आणि अन्य काही ठिकाणी सरकारी मोबाईल ॲपही लॉंच केले आहे. Many states made apps for liqer home delivery

    दिल्लीतील उत्पादन शुल्क विभागाने यासंदर्भातील नियमात बदल केला आहे. घरबसल्या मद्य पोचवण्याची परवानगी केवळ परवानाधारक विक्रेत्यांनाच देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक दारुच्या दुकानातून होम डिलिव्हरी केली जाणार नाही.



    दिल्ली सरकारच्या नव्या नियमानुमार मोबाईल ॲप, संकेतस्थळ या माध्यमातून ऑर्डर बुक करता येणार आहे. यानंतर संबंधित दुकानदार किंवा परवानाधारक विक्रेता आपल्या घरी मद्य पोचवेल. याबाबतची प्रक्रिया लवकरच दिल्ली सरकारकडून जारी केली जाणार आहे.

    हॉस्टेल, ऑफिस आणि अन्य ठिकाणी दारु मागवता येणार नाही. सध्या सरसकट दारुचे दुकाने सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. कोविडवर संपूर्णपणे नियंत्रण मिळवल्यावरच दारुचे दुकाने सुरू होण्याची शक्यता आहे. महसूलाचे अधिक नुकसान होऊ नये, यासाठी सरकारने होम डिलिव्हरी सेवा सुरू केली आहे.

    Many states made apps for liqer home delivery

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य