• Download App
    राहुल गांधी, नितीन गडकरी, ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेत्यांनी या दुर्घटनेवर व्यक्त केले दु:ख, वाचा कोण काय म्हणाले?Many leaders including Rahul Gandhi, Nitin Gadkari and Mamta Banerjee expressed grief over the accident, know who has said what

    Bipin Rawat Helicopter Crash: राहुल गांधी, नितीन गडकरी, ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेत्यांनी या दुर्घटनेवर व्यक्त केली चिंता, वाचा कोण काय म्हणाले?

     

    तामिळनाडूतील कुन्नूरमध्ये हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह हेलिकॉप्टरमध्ये १४ जण स्वार होते. काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेत्यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला असून जखमींसाठी प्रार्थना केली आहे.Many leaders including Rahul Gandhi, Nitin Gadkari and Mamta Banerjee expressed grief over the accident, know who has said what


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : तामिळनाडूतील कुन्नूरमध्ये हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह हेलिकॉप्टरमध्ये १४ जण स्वार होते. काँग्रेस नेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेत्यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला असून जखमींसाठी प्रार्थना केली आहे.

    काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ट्विट केले की, “सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि हेलिकॉप्टरमधील इतर सुरक्षित असतील अशी आशा आहे. ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.”

    या अपघातामुळे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनाही धक्का बसला आहे. त्यांनी ट्विट केले की, “सीडीएस बिपिन रावत जी यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरच्या अपघाताबाबत ऐकून धक्का बसला. सर्वजण सुरक्षित असावेत यासाठी प्रार्थना करतो.”

    ममता बॅनर्जी यांनी ट्विट केले की, “कुन्नूरमधून अतिशय दुःखद बातमी येत आहे. आज संपूर्ण देश सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह हेलिकॉप्टरमध्ये उपस्थित असलेल्या सर्व लोकांसाठी प्रार्थना करत आहे. जे जखमी झाले आहेत ते लवकर बरे व्हावेत.”

    कोण-कोण होते स्वार?

    अपघात झालेल्या लष्करी हेलिकॉप्टरमध्ये १४ जण होते. यामध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर एलएस लिडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, एनके गुरसेवक सिंग, एनके जितेंद्र कुमार, एल/नायक विवेक कुमार, एल/नायक बी साई तेजा, हवालदार सतपाल यांचा समावेश होता.

    Many leaders including Rahul Gandhi, Nitin Gadkari and Mamta Banerjee expressed grief over the accident, know who has said what

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक