• Download App
    Mansukh Mandaviya Profile : कोण आहेत मनसुख मंडाविया, हर्षवर्धन यांच्या जागी बनले आरोग्यमंत्री, असा आहे राजकीय प्रवास । Mansukh Mandaviya Profile Know About New Health Minister In Modi Cabinet Mandaviya

    Mansukh Mandaviya Profile : कोण आहेत मनसुख मंडाविया, हर्षवर्धन यांच्या जागी बनले आरोग्यमंत्री, असा आहे राजकीय प्रवास

    Mansukh Mandaviya Profile :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यादरम्यान, गुजरातचे राज्यसभेचे खासदार मनसुख मंडाविया यांनी मंत्रिमंडळात केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणून शपथ घेतली. डॉ. हर्षवर्धन यांच्या जागी मंडावियांना भारताचे नवीन आरोग्यमंत्री बनवण्यात आले. देशातील कोरोना महामारीच्या काळात आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्यामुळे मंडावियांच्या पोर्टफोलिओला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. Mansukh Mandaviya Profile Know About New Health Minister In Modi Cabinet Mandaviya 


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यादरम्यान, गुजरातचे राज्यसभेचे खासदार मनसुख मंडाविया यांनी मंत्रिमंडळात केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणून शपथ घेतली. डॉ. हर्षवर्धन यांच्या जागी मंडावियांना भारताचे नवीन आरोग्यमंत्री बनवण्यात आले. देशातील कोरोना महामारीच्या काळात आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्यामुळे मंडावियांच्या पोर्टफोलिओला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

    मनसुख मंडाविया यापूर्वी बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री आणि रसायने व खते राज्यमंत्री म्हणून काम करत होते. 2016 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला. 2012 मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले आणि 2018 मध्ये त्यांची पुन्हा निवड झाली. 2011 मध्ये मोदी मुख्यमंत्री असताना ते गुजरात अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनचे चेअरमन होते.

    2002 मध्ये सर्वात तरुण आमदार बनले मंडाविया

    सौराष्ट्राच्या भावनगर जिल्ह्यातील पालिताना तालुक्यातील हनोल या लहानशा खेड्यातल्या मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्मलेले मंडाविया वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी 2002 मध्ये सर्वात तरुण आमदार बनले. प्राण्यांवरील त्यांच्या प्रेमामुळेच त्यांना गुजरातमधील पशुवैद्यकीय अभ्यासासाठी प्रेरित केले. नंतर त्यांनी पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले.

    पदयात्रांसाठी प्रसिद्ध आहेत मंडाविया

    मनसुख मंडाविया हे त्यांच्या पदयात्रांकरिता प्रसिद्ध आहेत. गावे जोडण्यासाठी आणि जनजागृती करण्याच्या उदात्त कारणासाठी पायी प्रवास केलेले आहेत. 2005 मध्ये आमदार म्हणून त्यांनी पहिली पदयात्रा आयोजित केली होती, तेव्हा त्यांनी मुलींच्या शिक्षणाबद्दल जनजागृतीसाठी पालितानाच्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या 45 खेड्यांचा 123 किमीचा प्रवास केला होता. त्यांचा दुसरा प्रवास 2007 मध्ये ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ आणि ‘व्यसन हटाओ’ या थीमअंतर्गत होता, यात त्यांनी 127 किमीची प्रवास करत 52 गावांमध्ये जनजागृती केली होती.

    2019 मध्ये त्यांनी महात्मा गांधींची विचारधारा व मूल्यांचा प्रचार करण्यासाठी एक आठवड्याची पदयात्रा केली. यात्रेच्या 150 किमी मार्गावर 150 खेड्यांचा समावेश होता. पंतप्रधान भारतीय जनऔषधी परियोजना (पीएमबीजेपी) चे ते एक सक्रिय भागीदार आहेत. मे 2019 मध्ये महिलांच्या मासिक पाळीविषयी त्यांनी केलेल्या जनजागृतीबद्दल युनिसेफतर्फे त्यांना गौरविण्यात आले.

    Mansukh Mandaviya Profile Know About New Health Minister In Modi Cabinet Mandaviya

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!