• Download App
    सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करत मनिष तिवारी यांचा कॉँग्रेस नेतृत्वापुढे लोटांगणाचा प्रयत्न, म्हणजे पाकिस्तानवर कोणाताही परिणाम झाला नाही|Manish Tiwari's attempt to sway the Congress leadership by questioning the surgical strike has had no effect on Pakistan.

    सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करत मनिष तिवारी यांचा कॉँग्रेस नेतृत्वापुढे लोटांगणाचा प्रयत्न, म्हणजे पाकिस्तानवर कोणाताही परिणाम झाला नाही

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पुस्तकामध्ये यूपीए सरकारवर टीका करून कॉँग्रेसच्या नेतृत्वाची नाराजी मनिष तिवारी यांनी ओढवून घेतली होती. आता भाजपवर टीका करत सर्जिकल स्ट्राईकवरच प्रश्न उपस्थित करून तिवारी यांनी कॉँग्रेस नेतृत्वासमोर लोटांगण घालण्याचा प्रयत्न केला आहे.Manish Tiwari’s attempt to sway the Congress leadership by questioning the surgical strike has had no effect on Pakistan.

    मनमोहन सिंग सरकारच्या काळात भारताने संयम दाखविला, त्याला पाकिस्तानने हा आपला दुबळेपणा मानला. मात्र, मोदी सरकारने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा पाकिस्तानवर कोणताही परिणाम झाला नाही, असे तिवारी म्हणाले.



    तिवारी यांचे १० फ्लॅश पॉईंट्स; २० इयर्स – नॅशनल सिक्युरिटी सिच्युएशन्स दॅट इम्पॅक्टेड इंडिया हे पुस्तक प्रकाशित झाले. २६/११ च्या हल्ल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने पाकिस्तानवर कारवाई न केल्याची टीका तिवारी यांनी पुस्तकातून केली. पुस्तकाचा हा अंश गेल्या महिन्यात समोर आला होता.

    त्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली होती. त्यावरून तिवारी यांनी पुस्तक प्रकाशनादरम्यान नेतृत्वाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. तिवारी म्हणाले, की यूपीए सरकार संरक्षणाच्या बाबतीत कमकुवत होते, असे मी कुठेही म्हटलेले नाही. भारताच्या संयमाला पाकिस्तानने नेहमी दुबळेपणा मानले आहे. त्यावेळी भारताने संयम दाखविला.

    सर्जिकल स्ट्राईकचा पाकिस्तानवर कोणताही परिणाम झाला नाही. तसे असते तर उरी हल्ल्यानंतर केलेल्या सर्जिकल स्टाईकचा परिणाम दिसला असता. पुलवामा हल्ला घडला नसता. उलट सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय लाभ होतो, असा एनडीएने चुकीचा अर्थ काढल्याची टीकाही तिवारी यांनी केली. पाकिस्तानच्या वर्तणुकीत बदल झाल्याचा कोणताही पुरावा नाही, असे तिवारी म्हणाले.

    आपल्या कामाचे जोरदार मार्केटिंग करणे, ही सरकारची प्राथमिकता झाली आहे. आधी गुपचूप काम करून विरोधकांना संदेश देण्याची पद्धत होती. मात्र, उरी स्ट्राईकनंतर नवी पद्धत रूढ होत असल्याचे तिवारी यांनी सांगितले.

    Manish Tiwari’s attempt to sway the Congress leadership by questioning the surgical strike has had no effect on Pakistan.

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक