वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीच्या अरविंद केजरीवाल मंत्रिमंडळातील दोन मंत्री उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि शिक्षण मंत्री सत्येंद्र जैन या तुरुंगात असलेल्या दोन्ही मंत्र्यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचे राजीनामे दिले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले असून सध्या त्यांच्याकडची खाती स्वतःकडेच ठेवली आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील एका मंत्राच्या राजकीय वर्तणुकीविषयी सोशल मीडिया चर्चा सुरू झाली आहे.Manish Sisodia, Satyendar Jain resign as Delhi ministers; But Nawab Malik did not resign till the end!!
नवाब मलिक यांनी अटक झाल्यानंतरसी अखेरपर्यंत मंत्रिपदाचा राजीनामा दिला नव्हता. उद्धव ठाकरे यांना शिवसेनेतील बंडा नंतर राजीनामा द्यावा लागला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी पद सोडले म्हणून आपोआपच नवाब मलिक यांचे मंत्रीपद गेले होते.
मनीष सिसोदिया यांना दारू घोटाळ्यात सीबीआयने अटक केली आहे, तर सत्येंद्र जैन हे गेल्या नऊ महिन्यांपासून अटकेतच आहेत. मनीष सिसोदिया यांनी दिल्ली सरकारच्या दारू धोरणात परस्पर बदल करून दारू उत्पादक आणि वितरकांना 6 % ऐवजी 12% कमिशन मिळवून देऊन त्या बदल्यात भरपूर माया जमवली होती. सीबीआयने या संदर्भात बराच काळ तपास करून सिसोदिया यांना अखेर अटक केली. त्यांना 4 मार्चपर्यंत सीबीआय कोठडी ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्याचबरोबर या आदेशा विरोधात थेट सुप्रीम कोर्टात गेल्यामुळे देखील त्यांना सुप्रीम कोर्टाकडून फटकार मिळाली आहे.
या पार्श्वभूमीवर मनीष सिसोदिया यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्रीच मंत्रिपदाचा राजीनामा देतो म्हटल्यानंतर सत्येंद्र जैन यांनी स्वतःकडे 9 महिने राखून ठेवलेले मंत्रीपद देखील अखेर सोडले आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध आरोप होऊन त्यांना अटक झाली, त्यावेळी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. पण नबाब मलिक यांना दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याशी मनी लॉन्ड्रींग केल्याच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर देखील राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा राजीनामा घेतला नव्हता. एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेले त्यामुळे आपोआपच नबाब मलिक यांचे मंत्रीपद गेले होते. याविषयी सोशल मीडियात सिसोदिया आणि जैन यांच्या राजीनाम्यानंतर चर्चा आहे.
Manish Sisodia, Satyendar Jain resign as Delhi ministers; But Nawab Malik did not resign till the end!!
महत्वाच्या बातम्या
- सचिन वाझे, अँटिलिया स्फोटके, मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणावर लवकरच वेब सिरीज
- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण लवकर संपवायचेय, युक्तिवाद २ दिवसांत पूर्ण करा; सरन्यायाधीश चंद्रचूडांचे निर्देश
- पंतप्रधान मोदींचा ओबीसी, पसमांदा मुसलमान संपर्क दुप्पट; विरोधकांची फोडा आणि झोडा नीती चितपट!!
- नाफेड कडून कांदा खरेदी सुरू; विरोधकांचा मात्र विधानसभेत गदारोळ; फडणवीसांचे हक्कभंग आणण्याचे आव्हान!!