• Download App
    Manipur Violence: महिलेला विवस्त्र फिरायला लावल्याप्रकरणी पोलिसांनी पाचव्या आरोपीस केला अटक! Manipur Violence Police makes fifth arrest in case of making a woman roam naked search operation continues

    Manipur Violence: महिलेला विवस्त्र फिरायला लावल्याप्रकरणी पोलिसांनी पाचव्या आरोपीस केला अटक!

    घटनेच्या व्हिडिओमध्ये दिसणार्‍या अन्य आरोपींना पकडण्यासाठी पोलिस सातत्याने छापे टाकत आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मणिपूरमध्ये एका महिलेला नग्नावस्थेत फिरायला लावल्याप्रकरणी पोलिसांनी पाचव्या आरोपीलाही अटक केली आहे. व्हिडिओमध्ये दिसणार्‍या अन्य आरोपींना पकडण्यासाठी पोलिस सातत्याने छापे टाकत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पंतप्रधान मोदींनी याचा निषेध केला आहे, त्याचबरोबर या घटनेत सहभागी असलेल्या सर्व आरोपींना लवकरच पकडून कठोर शिक्षा केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनीही या आरोपींना अटक करून संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले. Police makes fifth arrest in case of making a woman roam naked search operation continues

    गेल्या २४ तासांत राज्यातील स्थिती चिंताजनक आहे. अनेक ठिकाणी लोकांनी शांततेत निदर्शने केली. पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दल वेगवेगळ्या ठिकाणी शोध मोहीम राबवत आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 126 चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत नियम मोडणाऱ्या 413 जणांना ताब्यात घेतले आहे. याशिवाय पोलिसांनी स्थानिक लोकांना शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे सांगितले आहे.

    मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग म्हणाले होते की, आम्हाला मोठा धक्का बसला आहे. मी दोषींना अनुकरणीय शिक्षा देण्याचे आश्वासन देतो. शक्य झाल्यास मी फाशीची मागणी करेन. मी लोकांना आवाहन करतो की, रस्ते अडवू नका आणि सुरक्षा दलांना रोखू नका. या घटनेचा मी राज्यातील जनतेच्या वतीने निषेध करतो.

    विशेष म्हणजे मणिपूरमध्ये महिलांची नग्न परेड केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या सीएम एन बिरेन सिंह यांनी पोलिसांना विशेष सूचना दिल्या होत्या. या प्रकरणात आतापर्यंत काही आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर इतर अनेक आरोपींना अटक व्हायची आहे, असे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी सांगितले होते. त्याचवेळी मणिपूरमध्ये महिलांची नग्न परेड केल्याचा मुद्दा संसदेत पोहोचला आहे. या मुद्यांवरून शुक्रवारीही संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ झाला आणि सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.

    Manipur Violence Police makes fifth arrest in case of making a woman roam naked search operation continues

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले