माणुसकीला लाजवणाऱ्या या घटनेच्या व्हिडिओने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
विशेष प्रतिनिधी
इंफाळ : ईशान्येकडील मणिपूर राज्यात महिलांवर अत्याचार करून त्यांना नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरायला लावल्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. खुयरूम हेरदार असे आरोपीचे नाव आहे. Manipur violence Arrested the main accused who tortured women and left them naked on the streets
प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी आज (गुरुवार) सकाळी थॉउबल येथून आरोपीला अटक केली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या घटनेच्या व्हिडिओवरून पोलिसांनी ३२ वर्षीय हेरदासची ओळख पटवली आहे. या व्हिडिओमध्ये आरोपी हिरव्या रंगाचा टी-शर्ट घातलेला दिसत आहे. मणिपूर पोलिसांचे म्हणणे आहे की, हेरादास हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.
या घटनेचा व्हिडिओ काल म्हणजेच बुधवारपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर हा व्हिडिओ आता हटवण्यात आला आहे. माणुसकीला लाजवणाऱ्या या व्हिडिओने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. ४ मे रोजी घडलेल्या या घटनेमुळे लोकांचा संताप पोलिस-प्रशासनावर उमटत आहे. हा व्हिडीओ एवढा जुना असूनही पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत कोणतीही कारवाई का केली नाही, याबाबत नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. मात्र, आता गांभीर्य दाखवत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Manipur violence Arrested the main accused who tortured women and left them naked on the streets
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटक विधानसभेतून भाजपचे 10 आमदार निलंबित; भाजप आणि जेडीएसने अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव ठेवला
- द फोकस एक्सप्लेनर : 11 पक्षांचे 91 खासदार NDA आणि ‘I.N.D.I.A.’ दोन्हींपासून अंतर राखून, तेच किंगमेकर बनणार? वाचा सविस्तर
- ऑस्ट्रेलियन समुद्रकिनाऱ्यावर सापडलेली ‘त्या’ रहस्यमयी वस्तूबाबत ‘ISRO’ प्रमुख सोमनाथन यांचं मोठं विधान, म्हणाले…
- व्हिडिओ कांडात अडकलेल्या किरीट सोमय्यांच्या मदतीला आले जितेंद्र आव्हाड!!