• Download App
    मनिके मागे हिथे झाले 'मा मांटी मानुष हिथे'! ममता बॅनर्जीना समर्पित हे गाणे वापरले जाणार भवानीपुर बायपोल कॅम्पेन मध्ये | Manike maage hithe Bengali version dedicated to Mamta Baneerjee, Maa Manti Manush Hithe to be used in Bhawanipur bypoll campaigns

    मनिके मागे हिथे झाले ‘मा मांटी मानुष हिथे’! ममता बॅनर्जीना समर्पित हे गाणे वापरले जाणार भवानीपुर बायपोल कॅम्पेन मध्ये

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : मनिके मागे हिथे हे श्रीलंकन गाणे सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. गाण्याची भाषा समजत नसली, तरी प्रत्येकजण या गाण्यावर थिरकत आहे. इंस्टाग्राम व  व्हाट्सअप स्टेटस मध्ये सगळीकडे हे गाणं शेअर होत आहे आणि भरपूर प्रमाणात रिल्स ही बनवल्या जात आहेत.

    Manike maage hithe Bengali version dedicated to Mamta Baneerjee, Maa Manti Manush Hithe to be used in Bhawanipur bypoll campaigns

    सिंहली भाषेतले हे गाणे योहानी ने गायलेले आहे. या गाण्यातील मधुर आवाज आणि चाल ही भाषा, देश या सगळ्याचे बंधन विसरायला लावते. मेदिनिपुर येथील एका बाप-लेकीचा जोडीने या गाण्याची धून बंगालीमध्ये केली असून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना समर्पित केली आहे. सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे राजेश चक्रवर्ती आणि त्यांची मुलगी अपराजिता यांनी हे गाणे गायलेले आहे. याही गाण्याची लोकप्रियता वाढली असून भरपूर लोकांनी हे गाणे पाहिलेले आहे. आता हेच गाणे ममता बॅनर्जी यांच्या भवानीपुर बायपोल कॅम्पेन मध्ये वापरले जाणार आहे.

    Manike maage hithe Bengali version dedicated to Mamta Baneerjee, Maa Manti Manush Hithe to be used in Bhawanipur bypoll campaigns

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amritpal : अमृतपालवरील NSA वर्षभरासाठी वाढवला; २३ एप्रिलपासून लागू होणार, हायकोर्टात अपिलाची तयारी

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!