• Download App
    माणिक साहा दुसऱ्यांदा बनणार त्रिपुराचे मुख्यमंत्री; भाजपा विधिडमंडळ बैठकीत झाला निर्णय Manik Saha has been elected as legislative party leader by BJP MLAs He will be the CM of the state

    माणिक साहा दुसऱ्यांदा बनणार त्रिपुराचे मुख्यमंत्री; भाजपा विधिडमंडळ बैठकीत झाला निर्णय

    शपथविधीसाठी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा उपस्थित असणार

    प्रतिनिधी

    नुकत्याच पार पडलेल्या त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड येथील विधानसभा निवडणुकीत  भाजपाने घवघवीत यश मिळवत सत्ता काबीज केली आहे. तर त्रिपुरामध्ये मुख्यमंत्री पदी कोणाची वर्णी लागणार यावरून काही नावांची चर्चा होती. यामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांचेही नाव आघाडीवर होते. मात्र भाजपाने माणिक साहा यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवतच पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदासाठी त्यांची निवड केली आहे. भाजपाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय आज घेण्यात आला. Manik Saha has been elected as legislative party leader by BJP MLAs He will be the CM of the state

    माणिक साहा हे दुसऱ्यांदा त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री आणि नवीन मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा बुधवार ८ मार्च रोजी होणार आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जेपी नड्ड यांची उपस्थिती असणार आहे.


    Lok Sabha Election 2024 : यंदाही काँग्रेससाठी अमेठीची निवडणूक अवघडच; अखिलेश यादवने वाढवली डोकंदुखी!


    मे २०२२ मध्ये माणिक साहा यांना तत्कालीन मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच पक्षाने मुख्यमंत्री म्हणून घोषित केले होते. १५ मे २०२२ रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. बारदोवली मतदारसंघातून निवडून आलेले माणिक साहा यांनी पक्षाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे असल्याचे सांगितले आहे. भाजपाची ही कामगिरी अपेक्षित होती. आम्ही आतुरतेने या क्षणाची वाट पाहत होतो. आमची जबाबदारी आता अधिक वाढली आहे. पंतप्रधान मोदींनी दर्शवलेल्या मार्गाने आम्ही वाटचाल करू. असं माणिक साहा म्हणाले आहेते.

    २०१६ मध्ये काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश  –

    माणिक साहा यांनी २०१६ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्या अगोदर ते काँग्रेसमध्ये होते. भाजपाशी जुडल्यानंतर त्यांना बूथ व्यवस्थापन समिती आणि राज्यस्तरीय सदस्यता अभियानाच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या एक महिना अगोदरच राज्यसभेचे खासदारही बनवण्यात आलं होतं. मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. २०२० मध्ये त्यांना त्रिपुराचे प्रदेशाध्यक्ष बनवलं गेलं होतं.

    त्रिपुरामध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) 32 जागा जिंकल्या. पक्षाला जवळपास 39 टक्के मते मिळाली. तर टिपरा मोथा पक्ष 13 जागा जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 11, तर काँग्रेसला फक्त तीन जागा मिळाल्या. इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (IPFT) ने एक जागा जिंकून आपले खाते उघडण्यात यश मिळविले आहे.

    Manik Saha has been elected as legislative party leader by BJP MLAs. He will be the CM of the state.

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची