• Download App
    रामजन्मभूमी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अहमदनगरातून अटक : प्रेयसीच्या भावाला अडकवण्यासाठी रचला होता कट Man who threatened to blow up Ram Janmabhoomi with bomb arrested from Ahmednagar

    रामजन्मभूमी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अहमदनगरातून अटक : प्रेयसीच्या भावाला अडकवण्यासाठी रचला होता कट

    विशेष प्रतिनिधी

    अहमदनगर : रामजन्मभूमी मंदिर उडवून देण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या पत्नीला अहमदनगरमधून अटक करण्यात आली आहे. 2 फेब्रुवारी रोजी पहाटे पाचच्या सुमारास रामजन्मभूमी संकुलाच्या शेजारी राहणारे मनोज कुमार यांना फोनवरून राम मंदिर उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. Man who threatened to blow up Ram Janmabhoomi with bomb arrested from Ahmednagar

    अयोध्या पोलिसांना तपासात आढळून आले की, आरोपीने प्रेयसीच्या भावाला गोवण्यासाठी प्रेयसीचा मोबाइल नंबर वापरून नेट कॉलिंगद्वारे राम मंदिर उडवून देण्याची धमकी दिली होती. अयोध्येचे सर्कल ऑफिसर (सीओ) एसके गौतम यांनी सांगितले की, मनोज कुमार यांना ज्या नंबरवरून कॉल आला होता त्या नंबरची पाळत ठेवून तपासणी करण्यात आली. अनिल रामदास घोडके ऊर्फ ​​बाबा जान मुसा नावाच्या व्यक्तीने दिल्लीतील बिलाल याला त्याच्या नावाने नेट कॉल करून त्याला फसविण्याच्या उद्देशाने धमकावल्याची माहिती मिळाली.

    पोलीस पथकाने अहमदनगर येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरातून अनिल रामदास घोडके व त्याची पत्नी जरड संतान शनि ईश्वरा ऊर्फ ​​आयर्न सॅटर्न हेल यांना अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी पोलिसांची सतत दिशाभूल करत होते. कधी तो स्वतःला चेन्नईचा, तर कधी महाराष्ट्राचा रहिवासी सांगत होता.


    राम जन्मभूमी आंदोलनातले फायर ब्रँड वक्ते, नेते संत आचार्य धर्मेंद्रजी कालवश!; आंदोलनातला महत्त्वाचा अध्याय समाप्त!


    असे आहे प्रकरण…

    अयोध्याचे एसपी मधुबन सिंह यांनी सांगितले की, मनोज कुमार यांच्या फोनवर पहाटे 5 वाजता एका अनोळखी नंबरवरून कॉल आला होता. तेव्हा मनोज यांनी संबंधिताला विचारले तुम्ही कोण आहास? कुठून फोन करत आहात? यावर मी दिल्लीहून फोन करत असल्याचे फोन करणाऱ्याने सांगितले. आरोपी म्हणाला होता की, मी आज सकाळी 10 वाजता रामजन्मभूमी उडवून देईन.

    9 मोबाइल फोन, 2 कुराणांसह अनेक कागदपत्रे सापडली

    अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून नऊ मोबाइल फोन, लॅपटॉप, दोन कुराण, दोन मुस्लिम टोप्या, आधारकार्ड, पॅनकार्ड, एटीएम कार्ड, चेकबुक, जन्म प्रमाणपत्र, निवडणूक आयोगाचे साधे फॉर्म, सुधारित आधार कार्ड, तावीज माला यासह इतरही वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

    यापूर्वी दिल्ली मेट्रो स्टेशन उडवण्याची दिली होती धमकी

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल रामदास घोडके ऊर्फ बाबा जान मूसा याने यापूर्वीही असे प्रकार केले आहेत. रामजन्मभूमीसोबतच त्याने दिल्ली मेट्रो स्टेशनलाही बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती.

    Man who threatened to blow up Ram Janmabhoomi with bomb arrested from Ahmednagar

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली