विशेष प्रतिनिधी
कोलकता : विधानसभा निवडणूक नियोजित वेळापत्रकानुसार घेण्याच्या निर्णयावर फेरविचार करावा, कृपया, भाजपच्या आदेशानुसार तुम्ही निर्णय घेऊ नका. निवडणुकीचा कालावधी कमी करून, मग तो एक दिवसाचा असला तरी सार्वजनिक आरोग्याचे रक्षण तुम्ही करणार आहात, Mammatadidi request election commission
हे लक्षात घ्या, अशी आवाहनवजा विनंती मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला केली आहे.‘‘मी निवडणूक आयोगाला हात जोडून विनंती करते की, निवडणुकीचे तीन टप्पे एकाच दिवशी घ्यावेत. जर एका दिवशी शक्य नसेल तर निदान दोन दिवसांत मतदान घ्यावे आणि एक दिवस तरी वाचवावा,’’ असे त्या म्हणाल्या.
बंगालमध्ये कोरोनाच्या प्रसाराला काही प्रमाणात प्रतिबंध करण्यासाठी निवडणुकीच्या उर्वरित तीन टप्प्यांतील मतदान एकाच दिवशी घेण्याचे किंवा दोन दिवसांत मतदान घेण्याची विनंती ममता बॅनर्जी यांनी आयोगाला गेल्या आठवड्यात केली होती.
आयोगाने ही मागणी मान्य केली नाही. भाजपच्या आदेशावरून आयोगाने नकार दिला असण्याचा शक्य व्यक्त करीत नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत या निर्णयावर फेरविचार करावा, अशी विनंती ममता बॅनर्जी यांनी पुन्हा केली.