• Download App
    ममतादिदींच्या कथनी व करनीमध्ये फरक, जाहीर शब्द फिरवत बुवा – भतिजांनी घेतल्या जाहीर सभा|Mammata tooks rallies in murshidabad

    ममतादिदींच्या कथनी व करनीमध्ये फरक, जाहीर शब्द फिरवत बुवा – भतिजांनी घेतल्या जाहीर सभा

    विशेष प्रतिनिधी 

    कोलकता : कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या विचार करून आपण राज्यात आता यापुढे एकही मोठी जाहीर प्रचारसभा घेणार नाही अशी घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राणा भीमदेवी थाटात केलीMammata tooks rallies in murshidabad

    खरी. मात्र त्या व त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी स्वतःला सभा घेण्यापासून रोखू शकले नाहीत. या दोघांनीही काल तब्बल सहा जाहीर सभा घेतल्या आणि तेथे जोरदार प्रचार केला.



    कोरोना नियमांचा कोणताही विचार न करता त्यांनी सभा घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यांनी या सभा प्रामुख्याने मुर्शिदाबादच्या आसपास घेतल्या. हा भाग प्रामुख्याने मुस्लीमबहुल मानला जातो. त्यामुळे ममतादीदींच्या कळतनी व करनीमध्ये मोठा फरक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    वाढत्या कोरोनामुळे राज्यात सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी व त्यांच्या नेत्यांनी जाहीर सभा न घेण्याचे जाहीर केले आहे. सर्वात आधी ममतादीदींनी सभा न घेण्याचे जाहीर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली होती.

    मात्र त्यांनी हा शब्द न पाळता सभा घेतल्या. यावरून त्यांचा शब्द न पाळण्याचा फोलपण लक्षात येत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचे मतदान गुरुवारी होत आहे.

    ४३ मतदारसंघांमध्ये ३०६ उमेदवारांनी नशीब अजमावले आहे. कोरोनाच्या गंभीर तीव्रतेच्या दुसऱ्या लाटेच्या छायेत सुमारे एक कोटी मतदार आपला हक्क बजावण्याची अपेक्षा आहे.

    भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय, तृणमूलचे मंत्री ज्योतीप्रियो मलिक, चंद्रीमा भट्टाचार्य, भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तन्मय भट्टाचार्य हे प्रमुख उमेदवार या टप्प्यात रिंगणात आहेत. चित्रपट दिग्दर्शक राज चक्रवर्ती आणि अभिनेत्री कौशानी मुखर्जी यांचेही भवितव्य मतपेटीत बंद होईल.

    Mammata tooks rallies in murshidabad

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!