वृत्तसंस्था
कोलकाता : शिक्षक भरती घोटाळ्यात अडकलेल्या पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वेगळ्या प्रकारचा डच्चू दिला आहे. पार्थ चॅटर्जींना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने अटक केली. या अटकेपूर्वी पार्थ चॅटर्जी यांनी ममता बॅनर्जी यांना चार वेळा फोन केले पण ममता बॅनर्जी यांनी एकदाही त्यांचा फोन घेतला नाही. अशी बातमी आहे. ममता बॅनर्जींनी जणू तुमचे तुम्ही पाहून घ्या असाच राजकीय संदेश यातून पार्थ चटर्जी यांना देऊन टाकला आहे. Mamata out to the minister caught in ED
हेच ते पार्थ चटर्जी आहेत, ज्यांच्यावर विधानसभा निवडणूक काळात ममता बॅनर्जी यांचा प्रचंड मोठा विश्वास होता आणि पार्थ चॅटर्जी यांचा देखील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वावर गाढा विश्वास होता. परंतु 200 कोटी रुपयांच्या भरती घोटाळ्या प्रकरणात पार्थ चटर्जी अडकले. त्यांची ईडीने कसून चौकशी केली त्यांना अटक केली.
आपल्या सुटकेसाठी पार्थ चटर्जी यांनी जे बरेच प्रयत्न केले त्यातला एक सर्वात महत्त्वाचा प्रयत्न म्हणजे त्यांनी ममता बॅनर्जींना वारंवार फोन लावले. पण चार फोन लावून देखील ममता बॅनर्जी यांनी एकही फोन उचलला नाही. न्यायालयाने पार्थ चटर्जींची रवानगी ईडी कोठडीत केली. त्यानंतर त्यांनी छातीत दुखण्याची तक्रार केली त्यामुळे त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
दरम्यानच्या काळात पार्थ चॅटर्जींनी ममता बॅनर्जी यांच्याकडे सुटकेसाठी खूप प्रयत्न करून पाहिले. शुक्रवारी मध्यरात्री 2.32 वाजल्यापासून ते पहाटे ते सकाळी शनिवारी सकाळी 9.35 पर्यंत पार्थ चटर्जी यांनी ममता बॅनर्जींना किमान चार वेळा फोन लावले. पण त्यातला एकही फोन उचलला नाही की ममता बॅनर्जींनी नंतर उत्तर दिले नाही. पार्थ चॅटर्जींना ममता बॅनर्जी फोन उचलण्याची खूप आशा होती. त्यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांकडृन अटक वॉरंट घेतले नाही. त्यावर सही देखील केली नव्हती. अखेर चार फोन करूनही त्यांनी ममता बॅनर्जींनी कोणताही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे पार्थ चटर्जी यांना अखेरीस आपली अटक मान्य करावी लागली. ईडीने सादर केलेल्या अरेस्ट मेमो मध्ये चटर्जींनी ममता बॅनर्जींना केलेल्या कॉलचा सर्व तपशील नोंदवला आहे. 2:32 am, 2:33, 3:37, 9.35 am असे कॉलचे टायमिंग आहे.
अरेस्ट मेमो मध्ये पार्थ चॅटर्जींच्या कॉलचे टाइमिंग नोंदवण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी आक्षेप नोंदवला आहे. या प्रकारचे कॉलचे तपशील अरेस्ट मेमो मध्ये नोंदवण्याचे काहीच कारण नाही. त्या संदर्भातला खुलासा ईडीचेच अधिकारी देऊ शकतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Mamata out to the minister caught in ED
महत्वाच्या बातम्या