• Download App
    ममतांनी घेतली पीएम मोदींची भेट : पत्र देऊन मनरेगा, पीएम आवास आणि रस्ते योजनेसाठी निधीची मागणी|Mamata meets PM Modi Demands funds for MGNREGA, PM Awas and Road Scheme by writing a letter

    ममतांनी घेतली पीएम मोदींची भेट : पत्र देऊन मनरेगा, पीएम आवास आणि रस्ते योजनेसाठी निधीची मागणी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चार दिवसांच्या दौऱ्यावर दिल्लीत पोहोचल्या आहेत. दीदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील जीएसटी थकबाकीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यापूर्वी, ममता यांनी गेल्या वर्षी 24 नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांची भेट घेतली होती.Mamata meets PM Modi Demands funds for MGNREGA, PM Awas and Road Scheme by writing a letter

    ममतांची ही भेट अशा वेळी झाली आहे जेव्हा अंमलबजावणी संचालनालय (ईडी) त्यांच्या पक्षाचे नेते पार्थ चॅटर्जी यांच्यावर कारवाई करत आहे.



    निधी वाटपासाठी पंतप्रधान मोदींना पत्र सुपूर्द

    ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना एक पत्र सुपूर्द केले आहे. त्यात त्यांनी मनरेगा, पंतप्रधान आवास योजना आणि पंतप्रधान ग्रामीण सडक योजना राबविण्यासाठी राज्याला निधी देण्याचे आवाहन केले आहे. पत्रात त्यांनी लिहिले की, या योजनांबाबत केंद्राच्या वतीने 17,996 कोटी रुपये प्रलंबित आहेत.

    ममता यांनी पत्रात असेही लिहिले आहे की, विकास आणि लोककल्याणाशी संबंधित अनेक योजनांवर सरकारकडून सुमारे 1,00,968.44 कोटी रुपये देणे बाकी आहे. एवढी मोठी रक्कम रखडल्याने राज्यातील कामे पूर्ण करणे आणि लोकांसाठी सोयीसुविधा निर्माण करणे कठीण होत आहे.

    नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार

    बंगालच्या मुख्यमंत्री 7 ऑगस्ट रोजी राजधानीत होणाऱ्या नीती आयोगाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यासोबतच त्या विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेणार आहेत. आज रात्री ममता टीएमसीचे राज्यसभा सदस्य सुखेंदू शेखर रॉय यांच्या निवासस्थानी पक्षाच्या खासदारांना भेटू शकतात. शनिवारी त्या बिगरकाँग्रेस विरोधी नेत्यांशी राजकीय मुद्द्यांवर चर्चा करण्याची शक्यता आहे.

    उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी ममता यांचा दौरा महत्त्वाचा

    देशात 6 ऑगस्ट रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीमुळे ममता यांचा हा दौरा विशेष मानला जात आहे. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच त्यांनी संसदेच्या प्रत्येक अधिवेशनात दिल्लीत येण्याची घोषणाही केली होती. ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या खासदारांचे मनोबल वाढणार आहे.

    भाजप सरकारविरोधात पक्षाचे खासदार सातत्याने आंदोलने करत आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधी एकजुटीत फूट पडली असतानाही ममता बॅनर्जींची ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे. यापूर्वी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्येही तणाव निर्माण झाला होता.

    Mamata meets PM Modi Demands funds for MGNREGA, PM Awas and Road Scheme by writing a letter

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही