विशेष प्रतिनिधी
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष सूडबुध्दीने वागत आहे. कोणत्याही केंद्रीय तपास यंत्रणेनेने केलेल्या तपासात भ्रष्टाचार प्रकरणात दोषी आढळलो तर जाहीर फाशी घेऊ असे आव्हान ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल कॉँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी दिले आहे.Mamata Banerjee’s nephew Abhijit Banerjee said he will be hanged if found guilty in corruption case
कथित कोळसा घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या समन्सला उपस्थित राहण्यासाठी नवी दिल्लीला जाताना कोलकाता विमानतळावर बॅनर्जी बोलत होते. ते म्हणाले, मी नोव्हेंबरमध्ये जाहीर सभांमध्ये जे सांगितले होते त्याचाच पुनरुच्चार करतो.
जर कोणतीही केंद्रीय एजन्सी 10 पैशांच्याही बेकायदेशीर व्यवहारात माझा सहभाग सिद्ध करू शकली तर सीबीआय किंवा ईडीला चौकशी करण्याची गरज नाही. स्वत:ला सार्वजनिक व्यासपीठावर जाहीर फाशी घेईल. मी कोणत्याही तपासाला सामोरे जाण्यास तयार आहे. हे कोलकाताचे प्रकरण असूनही मला चौकशीसाठी दिल्लीला बोलावले आहे.
भाजपाने तारीख, वेळ आणि ठिकाण ठरवावे. तेथे मी जाईन. त्यांना उघडे पाडले नाही तर राजकारणात पाय ठेवणार नाही.बॅनर्जी यांना पश्चिम बंगालमधील कथित कोळसा घोटाळ्याशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात चौकशीसाठी 6 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील ईडी कार्यालयात हजर होण्यासाठी समन्स देण्यात आले आहे.
भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल करताना बॅनर्जी म्हणाले, केंद्रातील सत्ताधारी भाजप तपास यंत्रणांचा वापर राजकीय स्वार्थांसाठी करत आहे. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यावर तृणमूल कॉँग्रेसला राजकीय पातळीवर आव्हान देण्यास भाजपला अपयश आले आहे. त्यामुळेच आता भाजप सुडाचे राजकारण करत आहे.
Mamata Banerjee’s nephew Abhijit Banerjee said he will be hanged if found guilty in corruption case
महत्त्वाच्या बातम्या
- पंजशीर खोऱ्यात नॉर्दन अलायन्सकडून तालीबानला जबरदस्त दणका, ६०० तालीबानी ठार
- गांधी परिवारात प्रशांत किशोर यांच्या कॉँग्रेस प्रवेशाची चर्चा पण विरोध करत वरिष्ठ नेते म्हणतात ते तर फुस्स बॉँब
- छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे वडील म्हणतात ब्राम्हणांवर बहिष्कार टाका, पोलीसांनी दाखल केला गुन्हा
- South Africa Riots : दक्षिण आफ्रिकेत भारतवंशीयांकडून भयंकर हिंसाचार, डझनभर कृष्णवर्णीयांचा मृत्यू