Mallikarjun Kharge : गतमहिन्यात 11 ऑगस्ट रोजी राज्यसभेत गदारोळ झाल्याप्रकरणी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठे विधान केले आहे. याप्रकरणी चौकशी समिती गठित करण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. मी याप्रकरणी राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना विनंती केली आहे. कारण आता प्रकरण आधीच मिटले आहे आणि आता सभागृहही काम करत नाही. एकदा प्रकरण मिटल्यावर ते पुन्हा उकरू नये. Mallikarjun Kharge Said That There Is No Necessity To Constitute An Inquiry Committee To Probe Ruckus On August 11
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : गतमहिन्यात 11 ऑगस्ट रोजी राज्यसभेत गदारोळ झाल्याप्रकरणी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठे विधान केले आहे. याप्रकरणी चौकशी समिती गठित करण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. मी याप्रकरणी राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना विनंती केली आहे. कारण आता प्रकरण आधीच मिटले आहे आणि आता सभागृहही काम करत नाही. एकदा प्रकरण मिटल्यावर ते पुन्हा उकरू नये.
ते म्हणाले की, समिती स्थापन करणे आणि या प्रकरणाची चौकशी करणे योग्य नाही. आम्हाला विश्वास आहे की, यापुढे याची गरज पडणार नाही. मी इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही याची माहिती दिली आहे. अनेकांनी समितीच्या स्थापनेला नकार दिला आहे.
खरं तर, राज्यसभेत गदारोळासंदर्भात यापूर्वीच्या अशा घटनांचा सखोल अभ्यास झाला आहे. तेव्हा तर हेदेखील सांगितले जात होते की हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवले जाऊ शकते किंवा नवीन समितीदेखील स्थापन केली जाऊ शकते. राज्यसभेच्या पावसाळी अधिवेशनात काही अनियंत्रित घटनांवर कारवाई करण्याच्या विचारात नायडू म्हणाले होते की, सविस्तर विचार केल्यानंतर लवकरात लवकर योग्य निर्णय घेतला जाईल. सभागृहाच्या निवड समितीकडे विधेयके पाठवण्याबाबतही ते बोलले होते.
काय घडले होते राज्यसभेत?
यापूर्वी सरकारने 11 ऑगस्ट रोजी राज्यसभेतील गोंधळाबाबत अध्यक्षांना अहवाल सादर केला होता. त्यानुसार, माकपचे खासदार इलमारन करीम यांनी पुरुष मार्शलसोबत असभ्य कृत्य केले होते. त्याचवेळी काँग्रेसचे खासदार फुलोदेवी नेताम आणि छाया वर्मा यांनी लेडी मार्शलला ओढले होते. सभागृह नेते पीयूष गोयल आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी हे सभापतींच्या दालनातून त्यांच्या आसनाकडे जात असताना तृणमूल खासदार डोला सेने यांनी त्यांचा मार्ग रोखला होता आणि त्यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला होता.
Mallikarjun Kharge Said That There Is No Necessity To Constitute An Inquiry Committee To Probe Ruckus On August 11
महत्त्वाच्या बातम्या
- देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने दिलासादायक बातमी, जुलैमध्ये औद्योगिक उत्पादन 11.50 टक्क्यांनी वाढले
- मायावतींनी आत्तापर्यंत पोसलेले गुंड आता चालले ओवैसींच्या आश्रयाला; आधी अतिक अहमद, आता मुख्तार अन्सारीला ऑफर
- संतापजनक : मुंबईत ‘निर्भया’सारखी घटना, बलात्कारानंतर महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड, प्रकृती गंभीर
- West Bengal Bypolls : पोटनिवडणुकीसाठी ममतांचा भवानीपूरमधून अर्ज दाखल, भाजपकडून प्रियांका टिबरेवाल यांचे आव्हान
- भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांचा राहुल गांधींवर पलटवार, म्हणाले – नेहरूंच्या तुष्टीकरणामुळे काश्मीरची समस्या कायम