वृत्तसंस्था
बेळगावी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बेळगावात कर्नाटकच्या 11 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 16 हजार कोटी रुपयांचा किसान सन्मान निधी जमा केला. त्याचवेळी 2700 कोटी रुपयांच्या विविध कल्याण योजनांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. बेळगावत झालेल्या भव्यसमारंभात त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विषयी आदर दाखवून राजकीय भाष्य करत गांधी परिवारावर बोचरी टीका केली. Mallikarjun Kharge has served the public in whatever way possible.
छत्तीसगडची राजधानी रायपूर मध्ये नुकतेच काँग्रेसचे तीन दिवसांचे महाधिवेशन झाले या महाअधिवेशनाची अध्यक्षता काँग्रेसचे पक्षाध्यक्ष म्हणून मल्लिकार्जुन खरे यांनी केली. त्या वेळच्या कार्यक्रमात मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. ते उन्हात उभे राहिले होते. पण त्यांच्या डाव्या बाजूला माजी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी उभ्या होत्या आणि त्यांच्या डोक्यावर त्यांच्या सुरक्षारक्षकाने छत्री धरली होती. याच मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेळगावच्या किसान सन्मान निधी प्रधानाच्या कार्यक्रमात गांधी परिवारावर बोचरी टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की नुकतेच छत्तीसगड मध्ये काँग्रेसचे महाअधिवेशन झाले. कर्नाटकचे एक मोठे नेते मल्लिकार्जुन खर्गे माझे संसदेतले साथीदार आहेत. ते वयाने मोठे आहेत. त्यांनी आपल्या जीवनात जनतेची खूप सेवा केली आहे. मी त्यांचा आदर सन्मान करतो. पण छत्तीसगडच्या काँग्रेस अधिवेशनात मी जे बघितले, त्यामुळे मी हैराण झालो. मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासारखे सर्वात ज्येष्ठ नेते, काँग्रेसचे अध्यक्ष हे उन्हात उभे होते आणि छत्री मात्र दुसऱ्याच नेत्याच्या डोक्यावर होती. यावरूनच जनतेला समजते की काँग्रेसचा खरा रिमोट कंट्रोल नेमका कुणाकडे आहे ते!!
पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेनंतर काँग्रेसचे प्रवक्ते खवळले आहेत.
Mallikarjun Kharge has served the public in whatever way possible.
महत्वाच्या बातम्या
- सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा फडणीसांकडून निषेध; पण उद्धव ठाकरेंना बोचरा सवाल!!
- दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना दारू घोटाळ्यात सीबीआय कडून अटक!!; 10000 कोटींच्या उत्पादन शुल्काची अफरातफर
- चहात सोन्याचे पाणी घालता का??, अजितदादांचा सवाल; 70 हजार कोटी पाण्यात घातलेत त्याचा हिशेब दिला का??, मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर