Make In India : साऊथ कोरियातील दिग्गज टेक कंपनी सॅमसंगने नोएडामध्ये 4825 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत सॅमसंगने नोएडमध्ये कारखाना उभारला. यानंतर आता कंपनीने या कारखान्यात मोबाइल डिस्प्लेच्या प्रत्यक्ष उत्पादनालाही सुरुवात केली आहे. Make In India Samsung starts Production Of mobile display in Noida after Rs 4825 cr investment
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : साऊथ कोरियातील दिग्गज टेक कंपनी सॅमसंगने नोएडामध्ये 4825 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत सॅमसंगने नोएडमध्ये कारखाना उभारला. यानंतर आता कंपनीने या कारखान्यात मोबाइल डिस्प्लेच्या प्रत्यक्ष उत्पादनालाही सुरुवात केली आहे. सॅमसंगच्या या कारखान्यामुळे अनेक स्थानिक उत्पादकांना फायदा होणार आहे. सॅमसंग सध्या मोबाइल डिस्प्लेचे उत्पादन करत असले तरी पुढे चालनू आयटी डिस्प्ले पॅनलचेही उत्पादन करणार आहे.
उत्तर प्रदेश सरकारच्या विशेष सवलतींमुळे सॅमसंगने आपला हा प्रकल्प चीनमधून हलवून नोएडात आणला आहे. सरकारच्या विशेष प्रयत्नांमुळेच सॅमसंगने येथे 4825 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यूपी सरकारने दिलेल्या सवलतींमध्ये राज्य सरकारकडून पाच वर्षांसाठी 250 कोटी रुपयांची विशेष आर्थिक तरतूदही समाविष्ट आहे. याशिवाय कंपनीला केंद्र सरकारच्या इलेक्ट्रिक उत्पादने व सेमिकंडक्टर उत्पादनास प्रोत्साहन देण्याच्या योजनेअंतर्गत 460 कोटी रुपयांची विशेष सवलतही देण्यात आली आहे.
पूर्ण जगात वापर होत असलेल्या टीव्ही, मोबाइल फोन, टॅब्लेट, घड्याळी आणि इतर गॅजेट्सच्या डिस्प्लेंची 70 टक्के निर्मिती एकटी सॅमसंग कंपनी करते. सॅमसंगचे व्हिएतनाम, साऊथ कोरिया व चीनमध्येही यासंबंधीचे प्रकल्प कार्यरत आहेत.
Make In India Samsung starts Production Of mobile display in Noida after Rs 4825 cr investment
महत्त्वाच्या बातम्या
- ‘साहेब! कोंबड्यांनी अंडी देणं बंद केलंय..’ पुण्यात पोल्ट्री फार्म मालकाची पोलिसांत तक्रार
- मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय, उत्तर प्रदेशात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत मिळेल कोरोनाची लस
- Remdesivir Import Duty Free : सरकारने रेमडेसिव्हिरची इम्पोर्ट ड्यूटी हटवली, आणखी स्वस्त होणार इंजेक्शन, पुरवठाही वाढणार
- ‘शहरी माओवाद्यांकडून हिंसाचाराचा धोका..’ नक्षलवाद्यांविरुद्ध लढणारे निवृत्त IPS रवींद्र कदम यांनी दिला इशारा
- Corona Updates : देशात २४ तासांत पहिल्यांदाच ३ लाखांच्या जवळ आढळले रुग्ण, सर्वाधिक २०२० मृत्यू