विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : रेल्वे विभागामध्येही मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याच्या हालचाली सरकारी पातळीवर सुरू आहेत. कॅबीनेट सचिवालयाने याबाबतचा एक अहवाल तयार केला असून यामध्ये रेल्वेच्या काही विभागांचे एकत्रिकरण करण्याबरोबरच रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपने निधी आणून सर्वासामान्यांसाठीही खुली करण्यासारख्या शिफारसींचा समावेश आहे.Major improvements will also be made in the railway sector, the Cabinet Secretariat reported
कॅबिनेट सचिवालयाने रेल्वे मंत्रालयाला रेल्वे विकास निगम लिमिटेडचे इरकॉनमध्ये विलीनीकरण, रेल टेलचे आयआरसीटीसीमध्ये मध्ये विलीनीकरण करण्यास सांगितले आहे. रेल्वे मंत्रालयाच्या रचनेचा अभ्यास केल्यानंतर अर्थ मंत्रालयाचे प्रधान आर्थिक सल्लागार संजीव सान्याल यांनी हा अहवाल तयार केला आहे.
रेल्वेद्वारे चालविल्या जाणाºया ९४ शाळा केंद्रीय विद्यालय संघटनेच्या अंतर्गत आणण्याची शिफारस केली आहे. त्याचबरोबर रेल्वेची देशात १२५ रुग्णालये आहेत. त्यांच्या सुधारणांंसाठी निधी नाही. त्यामुळे ही रुग्णालये सामान्यांसाठीही खुली करण्याबरोबर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपने त्यांचा विकास करण्यात येणार आहे. यामुळे रेल्वे मंत्रालयाला केवळ रेल्वे सेवा चालवण्याच्या आणि देखभालीच्या मुख्य कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल.
संन्याल यांनी आपल्या अहवालात असे म्हटले आहे की इरकॉन एक विशेष पायाभूत सुविधा निर्माण कंपनी आणि आरव्हीएनएल जे जलदगती आधारावर रेल्वे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी प्रकल्प राबविणे अपेक्षित आहे. त्यामुळे दोघांचे विलिनीकरण होऊ शकते.
रेल्वे टेल, रेल्वे ट्रॅकवर ऑप्टिक फायबर नेटवर्कद्वारे एक मोठा टेलिकॉम इन्फ्रा प्रदाता तयार करण्याचाही यामध्ये समावेश आहे.या अहवालात चेन्नई, कपूरथला आणि रायबरेली येथील तीन कोच कारखाने, चित्तरंजन, वाराणसी आणि पटियालामधील लोकोमोटिव्ह युनिट्स आणि बिहारमधील येलाहंका (बेंगळुरू) आणि बेला येथे दोन रेल्वे व्हील युनिट ठेवण्यासाठी नवीन सार्वजनिक उपक्रम उभारण्यास सुचविण्यात आले आहे.
Major improvements will also be made in the railway sector, the Cabinet Secretariat reported
- चढ्ढा माझे नाव घेतले तर तुमचा चढ्ढा उतरवेल, राखी सावंतचा आपचे नेते राघव चढ्ढा यांना इशारा
- देशाच्या न्यायव्यवस्थेचे भारतीयकरण व्हावे, सध्याच्या वसाहतकालीन नियमांनी भारतीयांच्या गरजा पूर्ण होत नाहीत, सरन्यायाधीश रमणा यांचे आवाहन
- कोल्हापुरातील साहित्यिका सोनाली नवांगुळ यांना २०२० साहित्य अकादमीचा भाषांतरासाठीचा पुरस्कार जाहीर. ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ ह्या अनुवादित कादंबरीसाठी पुरस्कार जाहीर.
- कोकणसह विदर्भातही येत्या चोवीस तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे