विशेष प्रतिनिधी
जम्मू – जम्मू-काश्मीारच्या राजौरी जिल्ह्यात सुरक्षा दलांनी शक्तिशाली आयईडी स्फोटके निकामी केल्याने मोठा अनर्थ टळला. जम्मू- राजौरी राष्ट्रीय महामार्गावरील बाथुनी-दिलोग्रा रस्त्यावर एका जलवाहिनीच्या खाली ही स्फोटके पेरण्यात आली होती.Major breakthrough for army in J and K
ही स्फोटके आढळून आल्यानंतर येथील वाहतूक तीन तासांसाठी रोखण्यात आली होती. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी ही स्फोटके पेरली असावीत असा संशय व्यक्त होतो आहे.
दरम्यान जम्मूतील हवाईतळावर झालेल्या ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तपास संस्थेने आज काश्मीार खोऱ्यात चौदा ठिकाणांवर छापे घातले. काश्मीररमधील शोपियाँ, अनंतनाग आणि बनिहाल जम्मूच्या सूंजवान भागामध्येही कारवाई करण्यात आली.
राज्यात आता प्रथमच ड्रोनच्या माध्यमातून हल्ले सुरु झाल्याने सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे. सरकारने तसेच सुरक्षा दलांनी हे हल्ले गांभीर्याने घेतले असून त्याच्या मुळाशी जावून छडा लावण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत.
Major breakthrough for army in J and K
महत्त्वाच्या बातम्या
- चीनने एकाच दिवसात दिले १ कोटी ८० लाख कोरोना लसीचे डोस, आत्तापर्यंत नागरिकांना दिले १६३.७ कोटी डोस
- आरेला कारेनेच उत्तर देऊ, पण शिवसेना भवन फोडण्याबाबत वक्तव्य केले नाही, आमदार प्रसाद लाड यांनी केले स्पष्ट
- चित्रपटात भूमिका देण्यासाठी अभिनेत्रीकडे केली शरीरसुखाची मागणी, मनसेच्या कार्यकर्त्यांनी आरोपींना दिला चोप
- Tokyo Olympics : वंदनाच्या हॅटट्रिकने केली कमाल, 41 वर्षांनी हॉकी संघ ऑलिम्पिकच्या उपांत्यपूर्व फेरीत, आता लढत ऑस्ट्रेलियाशी