प्रयागराज मेडीकल कॉलेजवळ घडली घटना
विशेष प्रतिनिधी
प्रयागराज : माफिया अतिक अहमद आणि अशरफ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराज मेडिकल कॉलेजजवळ ही घटना घडली आहे. दोघांवर १० पेक्षा जास्त गोळ्या झाडण्यात आल्या. Mafia turned politician Atiq Ahmed and his brother Ashraf Ahmed shot dead while being taken for medical in Prayagraj
या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना प्रयागराज वैद्यकीय महाविद्यालयाजवळ पोलिसांच्या गाडीवर अज्ञात्यांनी हल्ला केला. या हल्यात दोघांचाही मृत्यू झाला.
पत्रकारांच्या गर्दीतून कोणीतरी अतिक अहमद आणि त्याच्या भावावर जवळून गोळीबार केला. गोळी झाडली तेव्हा तो त्याच्यासोबत उभा होता, असे मिश्रा यांनी सांगितले. या हत्येबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. घटनेचे काही व्हिडिओही समोर आले आहेत ज्यात अतिक अहमद आणि त्याचा भाऊ पत्रकारांशी बोलताना दिसत आहेत, तेव्हा कोणीतरी अतिकच्या डोक्यावर गोळी झाडली आणि दुसऱ्याच क्षणी त्याच्या भावालाही गोळी मारली. यानंतर दोघेही जागेवरच ठार झाले.
Mafia turned politician Atiq Ahmed and his brother Ashraf Ahmed shot dead while being taken for medical in Prayagraj
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी! जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या सभेत भीषण स्फोट
- जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यावर स्मोक बॉम्बने हल्ला, भाषणादरम्यान झाला स्फोट
- Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रेला १ जुलैपासून प्रारंभ; १७ एप्रिलपासून सुरू होणार नोंदणी
- गुजरातमध्ये आम आदमी पार्टीला मोठा धक्का, सुरतमधील ‘आप’चे सहा नगरसेवक भाजपमध्ये दाखल!