वृत्तसंस्था
चेन्नई : एखाद्या व्यक्तीची पत्नी ही त्याच्यापासून वेगळी राहत असेल आणि तिने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून टाकले असेल तर ते पतीसाठी मानसिक क्रौर्य समजले जाईल, असे मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाने पतीचा घटस्फोट अर्ज देखील मंजूर केला आहे. Madras High Court Verdict: Removal of mangalsutra by wife is mental cruelty to husband
न्यायालयाने काय सांगितले?
न्यायमूर्ती व्ही. एम. वेलुमणी आणि न्यायमूर्ती एस. साँथर यांच्या खंडपीठाने इरोड येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या सी. शिवकुमार यांच्या याचिकाकर्त्याला अनुमती देताना आणि यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हे निरीक्षण नोंदवले आहे. पती-पत्नीच्या घटस्फोटाचे कारण मंगळसूत्र बनले असून यासंदर्भात मद्रास उच्च न्यायालयाने पतीची याचिका मंजूर केली आहे. स्थानिक कौटुंबिक न्यायालयाचा 15 जून 2016 रोजीचा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती, ज्यामध्ये पत्नीने घटस्फोट देण्यास नकार दिला होता.
– महिलेची बाजू
या प्रकरणी महिलेची चौकशी केली असता तिने कबूल केले की विभक्त होण्याच्या वेळी तिने तिचे मंगळसूत्र म्हणून एक सोन्याची साखळी घातली होती, आणि नंतर ती काढून टाकली होती. मात्र आता त्या महिलेने ती साखळी काढून टाकली असून यानंतर मी केवळ साखळी काढून ते सोन्याचे प्रतिक ठेवले असल्याचे त्या महिलेने स्पष्ट केले आहे. याप्रकरणी महिलेच्या वकिलांनी हिंदू विवाह कायद्याच्या कलम 7 चा हवाला देऊन सांगितले की, महिलेने मंगळसूत्र घालणे आवश्यक नाही आणि त्यामुळे पत्नीने ते काढून टाकल्याने वैवाहिक नातेसंबंधावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा युक्तिवाद या महिलेच्या वकिलांनी केला.
Madras High Court Verdict: Removal of mangalsutra by wife is mental cruelty to husband
महत्वाच्या बातम्या
- विरोधकांची राजकीय (कु)बुद्धी : आधी संसदेवरचे सिंह दिसले “हिंस्र”; आता असंसदीय शब्दांसाठी “आग्रह”!!
- पेट्रोल – डिझेल स्वस्त, शुक्रवारपासून प्रमुख शहरांमध्ये असे असतील नवे दर!!
- PFIचा खतरनाक कट : ‘2047 पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची योजना’; बिहारमधून दोन संशयितांना अटक
- कॅनडात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना : भारतीय दूतावासाकडून कठोर कारवाईची मागणी