Madhya Pradesh Flood : मध्य प्रदेशात हवामान विभागाने 25 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ग्वाल्हेर, शिवपुरी, गुना, अशोक नगर, दतिया, शेओपूर, मोरेना आणि भिंडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) राजेश राजोरा यांनी सांगितले की, शिवपुरी, श्योपूर, ग्वाल्हेर आणि दतिया जिल्ह्यांमध्ये बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परिस्थितीची माहिती दिली आहे, त्यांनी सर्व शक्य मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. Madhya Pradesh Flood Hits 1171 Villages Army Called For Rescue Work says CM Shivraj Singh Chauhan
वृत्तसंस्था
भोपाळ : मध्य प्रदेशात हवामान विभागाने 25 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ग्वाल्हेर, शिवपुरी, गुना, अशोक नगर, दतिया, शेओपूर, मोरेना आणि भिंडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) राजेश राजोरा यांनी सांगितले की, शिवपुरी, श्योपूर, ग्वाल्हेर आणि दतिया जिल्ह्यांमध्ये बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परिस्थितीची माहिती दिली आहे, त्यांनी सर्व शक्य मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
मंगळवारी सकाळी शिवपुरी जिल्ह्यातील पिप्राउधा गावात पाच जणांची सुटका करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याव्यतिरिक्त, बिची गावात तीन लोक सुमारे 24 तास झाडावर अडकले होते. हे लोक बचावासाठी झाडावर चढले होते आणि नंतर त्यांना तेथे कोणताही मार्ग सापडला नाही, यामुळे त्यांना झाडावरच जीव मुठीत धरून राहावे लागले. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) पथकाने बोटीच्या मदतीने या तिघांची सुटका केल्याची माहिती मुख्यमंत्री चौहान यांनी दिली. ते म्हणाले की, पूरग्रस्त भागांचे हवाई सर्वेक्षण केले जाईल.
चौहान म्हणाले की, ग्वाल्हेर-चंबल भागातील एकूण 1171 गावे अतिवृष्टीमुळे प्रभावित झाली आहेत, विशेषत: शिवपुरी आणि शेओपूर, जिथे 800 मिमी पावसामुळे पूर परिस्थिती बनली आहे. ते म्हणाले की, आतापर्यंत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि SDRF ने 1600 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. 200 गावे अजूनही पूरग्रस्त आहेत. बाधित भागातील लोकांना वाचवण्यासाठी बोटींची मदत घेतली जात असल्याची माहिती मुख्यमंत्री चौहान यांनी दिली.
ते म्हणाले, “अतिवृष्टीमुळे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर-चंबल भागातील 1100 पेक्षा जास्त गावे प्रभावित झाली आहेत. शिवपुरी आणि शेओपूरमध्ये दोन दिवसात 800 मिमी पाऊस झाला आहे. या अनपेक्षित पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. मी कालपासून पूरग्रस्त भागांच्या स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे. मणीखेडा धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रभावित गावांना आधीच सतर्क करण्यात आले होते. लोकांना उच्च स्थळी पाठवून त्यांना बाहेर काढण्यात आले आणि मदत शिबिरे आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
Madhya Pradesh Flood Hits 1171 Villages Army Called For Rescue Work says CM Shivraj Singh Chauhan
महत्त्वाच्या बातम्या
- पश्चिम बंगाल निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसाचाराची सुनावणी पूर्ण, कलकत्ता उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
- ‘फक्त लग्नासाठी धर्म बदलणे चुकीचे’, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा शेरा, जोधा-अकबरचे दिले उदाहरण, नेमकं काय म्हटलंय कोर्टाने? वाचा सविस्तर…
- पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून मदत जाहीर, तब्बल 11 हजार 500 कोटींच्या तरतुदीस मान्यता; दुकानदार, कारागीर, पशुपालकांचाही विचार
- Share Market : शेअर बाजार नव्या उंचीवर, सेन्सेक्स 53500 वर पोहोचला, निफ्टीने 16000 टप्पा केला पार
- 15 August : स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर भारतीय ऑलिम्पिक दलाला विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करणार पीएम मोदी