सर्व प्रकारच्या लहान -मोठ्या खेळण्यांबरोबरच सणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूही या टॉय पार्कमध्ये बनवल्या जातील.
भारतीय बाजारपेठांमध्ये चीनी खेळण्यांचा बोलबाला आहे. मात्र आता या टॉय फॅक्टरी द्वारे मोदी सरकार चीनला शह देण्यास सज्ज आहे .
भारताच्या या स्वदेशी खेळण्यांची फॅक्ट्री चीनी खेळण्यांच्या फॅक्ट्रीला टक्कर देईल.
एका अंदाजानुसार, 2024 पर्यंत भारतातील खेळण्यांचा उद्योग 200 अब्ज रुपयांचा असेल.
विशेष प्रतिनिधी
नोएडा : भारता चीनच्या खेळण्यांच्या बाजाराला आव्हान देण्यासाठी सज्ज होत आहे. लवकरच देशातील मुले चीन नव्हे तर नोएडात बनवलेल्या खेळण्यांनी खेळतील. यमुना प्राधिकरण सेक्टर -33 मध्ये टॉय पार्क बनत आहे. यूपी सरकारच्या मते, आतापर्यंत देशातील 134 सुप्रसिद्ध खेळणी कंपन्यांनी या टॉय पार्कमध्ये जमीन खरेदी केली आहे. सुरुवातीला 410 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. टॉय पार्कमध्ये 6 हजारांहून अधिक लोकांना रोजगारही मिळणार आहे. सर्व प्रकारच्या लहान -मोठ्या खेळण्यांबरोबरच सणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूही या टॉय पार्कमध्ये बनवल्या जातील. MADE IN INDIA: Modi made it possible! Toy Factory: Investment of Rs 410 crore; With thousands of jobs …
‘मेड इन चायना’ खेळणी अनेकदा लहानग्यांचा जीवावार बेततात. तरीही लहानग्यांकडून खेळण्यांचा हट्ट केला जातो. त्यामुळे खेळण्यांचे बाजारपेठही चीनच्या विळख्यात सापडले आहे.
या बाजारपेठेत जवळपास 70 टक्के खेळणी चिनी बनावटीची आहेत. त्यांना भारतीय कंपन्या अजूनही समर्थ पर्याय उभा करू शकलेल्या नाहीत. परंतु आता चीन खेळण्यांना टक्कर देण्यासाठी उत्तर प्रदेश राज्यात भारतातील पहिली खेळण्यांची फॅक्ट्री निर्माण केली जात आहे.
योगी आदित्यनाथ सरकारने नोएडाच्या सेक्टर 33 मध्ये टॉय पार्कची निर्मिती केली आहे. या पार्कमध्ये 134 उद्योगपतींनी विविध खेळण्यांची फॅक्ट्री सुरु करण्यासाठी जमीन खरेदी केल्या आहेत.
या टॉय पार्कमध्ये खेळण्याच्या फॅक्ट्री सुरु करण्यासाठी 134 उद्योगपतींकडून 410.13 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. या खेळण्यांच्या फॅक्ट्रींमुळे देशातील 6157 लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. सध्या देशात लहान मुलांची खेळणी तयार करणा रे 4000 पेक्षा अधिक युनिट्स आहेत.
गेल्या वर्षी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून खेळण्यांची जगभरातील बाजारपेठेत भारताचा वाटा वाढण्यासंदर्भात चर्चा केली होती.
यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खेळण्याची मोठी बाजारपेठ सुरु करण्यासाठी अनेक निर्णय घेतले. यात उत्तर प्रदेशात खेळण्यांचे क्लस्टर (टॉय पार्क) यमुना एक्सप्रेसवे औद्योगिक प्राधिकरण क्षेत्रात निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरचं जमीन खरेदी करणाऱ्या कंपन्या या टॉय पार्कमध्ये फॅक्ट्री बनवण्याचे काम सुरु करणार आहेत.
फन राईड टॉयज एलएलपी, सुपर शूज, फन झू टॉयज इंडिया, आयुष टॉय मार्केटिंग, सनलॉर्ड अॅपरल्स, भारत प्लास्टिक, जय श्री कृष्णा, गणपती क्रिएशन्स आणि आरआरएस ट्रेडर्स या टॉय पार्कमध्ये जमीन संपादित करणाऱ्या प्रमुख कंपन्या आहेत. प्लास्टिक आणि लाकडापासून बनवलेली बॅटरीवर चालणारी खेळणी टॉय पार्कमध्ये बनवली जातील. सध्या भारतात चीनी बनावटीची खेळणी देशातील लहान मुले खेळतात. टॉय पार्कमध्ये खेळण्यांची फॅक्ट्री उभारण्यासाठी पुढे आलेल्या या कंपन्या चिनी बनावटीच्या खेळण्यांना आव्हान देतील.
MADE IN INDIA: Modi made it possible! Toy Factory: Investment of Rs 410 crore; With thousands of jobs …
महत्त्वाच्या बातम्या
- सोशल मीडिया बेलगाम घोड्यासारखे, नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशिक्षण घ्या आणि तयारीला लागा, योगी आदित्यनाथ यांचे आवाहन
- मंत्रीपदाच्या बळावर क्रुरतेचे राजकारण, उद्या आमची सत्ता आल्यावर तुम्हाला ते झेपणार नाही, गृह राज्य मंत्री सतेज पाटील यांना धनंजय महाडिक यांचा इशारा
- निरज चोप्रा : महाराष्ट्राचाच वंशज ! सदाशिव भाऊंच्या पराक्रमाचा साक्षिदार…पानीपत गाजवणार्या मराठी वीरांच तेज…!
- GRAND WELCOME NEERAJ ! भारत का बेटा सुवर्णवीर नीरज चोप्रा 9 ऑगस्टला मायदेशात ; स्वागतासाठी सज्ज मातृभूमि भारत