• Download App
    लुधियाना न्यायालयातील बॉँबस्फोट आत्मघातकी दहशतवाद्याकडूनच, स्फोटामागे आयएआयचा हात असल्याचा संशय|Ludhiana court bombing carried out by a suicide bomber, IAI suspected to be behind the blast

    लुधियाना न्यायालयातील बॉँबस्फोट आत्मघातकी दहशतवाद्याकडूनच, स्फोटामागे आयएआयचा हात असल्याचा संशय

    विशेष प्रतिनिधी

    लुधियाना: लुधियाना न्यायालयात झालेला बाम्बस्फोट हा आत्मघातकी दहशतवाद्याकडूनच झाला असल्याचे पुरावे सापडले आहेत. बॉम्बस्फोटामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.Ludhiana court bombing carried out by a suicide bomber, IAI suspected to be behind the blast

    बॉम्बस्फोटात ठार झालेल्या व्यक्तीची ओळख पटल्यानंतर महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. आतापर्यंत या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली असून राज्याचे पोलीस महासंचालक सिद्धार्थ चट्टोपाध्याय यांनी बॉम्बस्फोटामागे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.



    त्याबाबत काही इनपुट्सही पोलिसांच्या हाती लागले आहेत. लुधियाना स्फोटामागे आयएसआयचा हात असल्याचे दिसत आहे. आम्ही घटनेमागील प्रत्येक अँगलचा तपास करत आहोत. ड्रग माफिया आणि खालिस्तानी गटाने एकत्र येऊन आयएसआयच्या मदतीने हा आत्मघाती हल्ला घडवून आणला असण्याची दाट शक्यता आहे.

    असं नेक्सस प्रथमच समोर आलं आहे. यामागे पंजाबला अस्थिर करण्याचा आणि अशांतता पसरवण्याचा डाव दिसत आहे व योजनाबद्धपणे हा स्फोट घडवून आणला गेला आहे, असे पोलीस महासंचालकांनी सांगितले.बॉम्बस्फोटामागे मोठं कारस्थान आहे हे स्पष्टच आहे मात्र आमच्या तपास पथकाने २४ तासांच्या आत पदार्फाश केला आहे.

    आरोपी पकडले गेले आहेत. स्फोटामागचा उद्देशही जवळपास लक्षात आला आहे, असे सांगत सिद्धार्थ चट्टोपाध्याय यांनी सुसाइड बॉम्बर गगनदीप सिंगबाबत महत्त्वाची माहिती दिली. गगनदीपने पोलीस दलात काम केलेले होते.

    सुरक्षा व्यवस्थेबाबत त्याला नेमकी माहिती होती. त्यामुळे यंत्रणेला गुंगारा देऊन तो कोर्ट गाठू शकला, असे सांगताना गगनदीपने आयईडी पोटाला बांधले होते. त्यामुळेच कुणाला संशय आला नाही, असे महासंचालकांनी सांगितले.

    स्फोटात गगनदीप सिंग हा ठार झाला असून त्याची मैत्रीण असलेल्या महिला कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर रणजीत सिंग आणि सुखविंदर सिंग अशा आणखी दोन जणांना अटक करण्यात आली असून आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

    Ludhiana court bombing carried out by a suicide bomber, IAI suspected to be behind the blast

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य