• Download App
    Ludhiana Blast : जर्मनीतून अटक करण्यात आलेल्या जसविंदरचा खुलासा, पाकिस्ताननेच पंजाब निवडणुकीपूर्वी जातीय हिंसाचाराचा कट रचला । Ludhiana Blast Jaswinder arrested from Germany reveals Pakistan plotted communal violence before Punjab elections

    Ludhiana Blast : जर्मनीतून अटक करण्यात आलेल्या जसविंदरचा खुलासा, पाकिस्ताननेच पंजाब निवडणुकीपूर्वी जातीय हिंसाचाराचा कट रचला

    लुधियाना जिल्हा न्यायालय संकुलात २३ डिसेंबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी शीख फॉर जस्टिस (SFJ)या खलिस्तानी संघटनेचा सदस्य जसविंदर सिंग मुलतानी याला नुकतीच जर्मनीतून अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर 5 जण जखमी झाले. जर्मनीमध्ये अटक करण्यात आलेला खलिस्तानी समर्थक जसविंदर सिंग मुलतानी याच्या चौकशीत पंजाबमधील निवडणुकीपूर्वी जातीय हिंसाचार पसरवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असल्याचे समोर आले आहे. Ludhiana Blast Jaswinder arrested from Germany reveals Pakistan plotted communal violence before Punjab elections


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : लुधियाना जिल्हा न्यायालय संकुलात २३ डिसेंबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी शीख फॉर जस्टिस (SFJ)या खलिस्तानी संघटनेचा सदस्य जसविंदर सिंग मुलतानी याला नुकतीच जर्मनीतून अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर 5 जण जखमी झाले. जर्मनीमध्ये अटक करण्यात आलेला खलिस्तानी समर्थक जसविंदर सिंग मुलतानी याच्या चौकशीत पंजाबमधील निवडणुकीपूर्वी जातीय हिंसाचार पसरवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असल्याचे समोर आले आहे.



    जसविंदर सिंग मुलतानी याला जर्मन पोलिसांनी अटक करून काल न्यायालयात हजर केले. जसविंदरने न्यायालयाला सांगितले की, ‘पाकिस्तान पंजाब आणि भारताच्या इतर भागात निवडणुकांपूर्वी हिंसाचार पसरवण्याचा कोणत्याही प्रकारे प्रयत्न करत आहे. त्यांना जनता सरकारच्या विरोधात जाईल, अशी परिस्थिती निर्माण करायची आहे. भारतीय एजन्सी जसविंदरसिंग मुलतानीला बोलावून हवी तेव्हा त्याची चौकशी करू शकतात, मात्र सध्या त्याला तुरुंगात पाठवण्याची गरज नसल्याचे जर्मन न्यायालयाने म्हटले आहे.

    लुधियाना स्फोटाचे आयएसआय कनेक्शन

    पंजाब पोलिसांच्या डीजीपींनी यासंदर्भात एक मोठी माहिती माध्यमांना दिली आहे. लुधियानामध्ये झालेला स्फोट पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISIच्या सांगण्यावरून झाला आणि केवळ पंजाबमधील लुधियानाच नव्हे, तर देशातील इतर अनेक शहरेही या स्फोटाचे लक्ष्य होती. पंजाबमध्येही निवडणुका लवकर होणार असल्याने आयएसआयला प्रथम येथे अस्थिरता पसरवायची आहे. या स्फोटाशी संबंधित एका खलिस्तानी दहशतवाद्याला जर्मनीत पकडण्यात आले असून, त्याच्या चौकशीत अनेक गुपिते उघड झाली आहेत.

    Ludhiana Blast Jaswinder arrested from Germany reveals Pakistan plotted communal violence before Punjab elections

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!