अरविंद केजरीवालांच्या निवास्थानाच्या नूतनीकरणासाठी झालेल्या खर्चाच्या चौकशीचे उपराज्यपालां आदेश दिले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाच्या नूतनीकरणाचे प्रकरण सातत्याने जोर धरत आहे. उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांनी या प्रकरणाची फाईल मुख्य सचिवांकडे मागितली आहे. तर, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या देखभालीवर ४५ कोटी खर्च केल्याचा आरोप करत भाजपा सातत्याने अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत आहे. Lt Governor of Delhi VK Saxena strongly attacked AAP
दरम्यान, लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सचिवांशी संबंधित फाइल मागितल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते उपराज्यपालांवर हल्लाबोल करत आहेत. उपराज्यपालांच्या घराचेही कोटय़वधी खर्च करून नूतनीकरण करण्यात आल्याचा आरोपही पक्षाचे नेते करत आहेत.
दरम्यान, आता उपराज्यपालांनी आपले घर माध्यमांसाठी खुले असल्याचे म्हटले आहे. तुम्हाला पाहिजे तेव्हा आकार, किती नूतनीकरण झाले आहे का ते पाहू शकता. माझे घर सर्वसामान्यांसाठी खुले आहे, व्हिडिओग्राफी करण्यासाठी येऊ शकता. माझ्या घरात १५ कोटींचे नूतनीकरण झाले, असा दावा आम आदमी पार्टी करत आह मात्र तसे नाही. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या खर्चाचा अहवाल मागवला आहे, मला जी कारवाई करायची होती ती मी केली आहे. आता मुख्य सचिव याबाबत अहवाल देणार आहेत.
Lt Governor of Delhi VK Saxena strongly attacked AAP
महत्वाच्या बातम्या
- Watch : PM मोदींच्या ‘मन की बात’च्या 100 व्या भागाची कशी झाली तयारी? पाहा पडद्यामागील काही अद्भुत क्षण…
- ‘Mann Ki Baat @ 100’ : बिल गेट्स यांनी “मन की बात”च्या शतकाबद्दल पंतप्रधान मोदींना दिल्या शुभेच्छा, म्हणाले…
- मन की बात @100 : मुंबईत भाजपचे 5000 ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन
- भाजपचे टॉप बॉसेस कर्नाटकच्या रणमैदानात व्यग्र; विरोधकांचे बॉसेस कुस्तीगीर आंदोलनाला चिथावणी देण्यात व्यस्त!!